
लॉकडाऊनमध्ये फोटोग्राफर तेजस नेरूरकरने भन्नाट शक्कल लढवत मराठी अभिनेत्रींचे फोटोशूट केले आहे. या फोटोतील अभिनेत्री अभिज्ञा भावे आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)

तेजस नेरूरकरे अमृता सुभाषसह अशा अनेक मराठी अभिनेत्रींचे Virtual Photoshoot केले आहे. मोनोक्रोम फोटोंमध्ये या अभिनेत्रींचे सौंदर्य अधिकच खुललेले दिसत आहे.(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)

'हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर आज परत वेळ आली आहे " स्वदेशी " चा नारा देण्याची … स्वतःत स्वतःला नव्याने शोधण्याची' असं कॅप्शन देत तेजसने सारे फोटो शेअर केले आहेत. या फ्रेममध्ये अभिनेत्री अनुजा साठे आहे.(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)

तसंच यामध्ये त्याने सर्वगुणसमावेशक संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या साडीचे महत्त्व सांगितले आहे. या फ्रेममध्ये भाग्यश्री लिमये ही अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)

फोटोग्राफरने या अभिनेंचे फोटोशूट 'फोन टू फोन' केले आहे. त्यामुळे तेजसच्या या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हे फोटोशूट थेट दुबईहून केले आहे. यामध्ये तिची पैठणी अधिक खुलून दिसत आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)




