मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Birthday Special: बॉलिवूड सोडल्यानंतर तनुश्री दत्ता काय करत होती?

Birthday Special: बॉलिवूड सोडल्यानंतर तनुश्री दत्ता काय करत होती?

19 मार्च 1984 रोजी तनुश्री दत्ता हिचा जन्म झारखंडमधील (Jharkhand) जमशेदपूर इथं राहणाऱ्या एका बंगाली कुटुंबात झाला. शालेय शिक्षण जमशेदपूर इथं केल्यानंतर कॉलेज शिक्षणासाठी ती पुण्यात (Pune) आली.

19 मार्च 1984 रोजी तनुश्री दत्ता हिचा जन्म झारखंडमधील (Jharkhand) जमशेदपूर इथं राहणाऱ्या एका बंगाली कुटुंबात झाला. शालेय शिक्षण जमशेदपूर इथं केल्यानंतर कॉलेज शिक्षणासाठी ती पुण्यात (Pune) आली.

19 मार्च 1984 रोजी तनुश्री दत्ता हिचा जन्म झारखंडमधील (Jharkhand) जमशेदपूर इथं राहणाऱ्या एका बंगाली कुटुंबात झाला. शालेय शिक्षण जमशेदपूर इथं केल्यानंतर कॉलेज शिक्षणासाठी ती पुण्यात (Pune) आली.

    मुंबई 19 मार्च: आपल्या पहिल्याच चित्रपटात बोल्ड सीन देऊन रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) हिचा आज वाढदिवस आहे. तनुश्री दत्ताचा पहिला चित्रपट होता ‘आशिक बनाया आपने’. इमरान हाशमी यात नायकाच्या भूमिकेत होता. त्यानंतर तनुश्री दत्तानं अनेक चित्रपटांमधून बड्या कलाकारांसोबत काम केलं. नंतर मात्र ती चित्रपटसृष्टीतून दूर गेली.

    2018 मध्ये तिनं अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यावर विनयभंगाचा आरोप करत खळबळ माजवली. 2007 मध्ये हॉर्न ओके प्लीज (Horn ok Please) या चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी तिचा विनयभंग केल्याचा आरोप करत तनुश्री दत्तानं त्यांच्याविरुद्ध पोलीस केस दाखल केली होती. नाना पाटेकर यांनी हे सगळे आरोप फेटाळले, कालांतरानं या केसामधून ते सुटलेदेखील पण या घटनेमुळे बॉलिवूडमध्ये मी टू चळवळ (Me Too Movement) सुरू झाली. अनेक अभिनेत्रींनी पुढं येऊन आपलं लैंगिक शोषण झाल्याच्या तक्रारी खुलेआम मांडल्या. बॉलिवूडची काळी बाजू सर्वांसमोर आली. पैसा, प्रसिद्धीसाठी स्त्रियांचं होणारं शोषण आणि त्यात अडकलेल्या तथाकथित बड्या लोकांचे खरे चेहरे यामुळं लोकांसमोर आले. या चळवळीमुळे अनेक दिग्दर्शक, निर्माते यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली. अनेक स्त्रियांना आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडता आली त्यामुळं नवीन येणाऱ्या महिला कलाकारांनादेखील पाठबळ मिळालं. या सगळ्या चळवळीला कारणीभूत ठरली ती तनुश्री दत्ता.

    अवश्य पाहा - बॉलिवूडच्या किसिंग क्वीनला करायचंय पुनरागमन; 18 किलो वजन केलं कमी

    View this post on Instagram

    A post shared by Tanushree Dutta (@iamtanushreeduttaofficial)

    अवश्य पाहा - असा होणार देवमाणूस मालिकेचा शेवट; महाएपिसोड झाला लीक?

    19 मार्च 1984 रोजी तनुश्री दत्ता हिचा जन्म झारखंडमधील (Jharkhand) जमशेदपूर इथं राहणाऱ्या एका बंगाली कुटुंबात झाला. शालेय शिक्षण जमशेदपूर इथं केल्यानंतर कॉलेज शिक्षणासाठी ती पुण्यात (Pune) आली. पुण्यात शिक्षण घेत असताना तिनं मॉडेलिंगलाही सुरुवात केली होती. 2004 मध्ये मिस इंडिया (Miss India) किताबही तिनं जिंकला. त्यानंतर तिनं अभिनय क्षेत्रात कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला. 2005 मध्ये तिनं आशिक बनाया आपने हा पहिला चित्रपट केला. त्यानंतर लगेचच चॉकलेट, पाठोपाठ भागमभाग, ढोल, गुड बॉय बड बॉय असे काही चित्रपट तिनं केले. 2010 मध्ये आलेला अपार्टमेंट हा तिचा शेवटचा चित्रपट होता. अनेक चित्रपटांमधून काम करूनही तनुश्री दत्ताला अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही. त्यामुळं चित्रपटसृष्टीला रामराम ठोकून ती अमेरिकेला निघून गेली. ती बॉलिवूडमध्ये (Bollywood) पुनरागमन (Comeback) करणार असल्याची चर्चा आहे.

    बॉलिवूडमधून गायब झाल्यावर तनुश्री काय करत होती?

    बॉलिवूडमधून काढता पाय घेतल्यानंतर तिनं सद्गुरुंचं पुस्तक वाचलं. या पुस्तकामुळं तिला अध्यात्माची प्रेरणा मिळाली. त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टींमुळे तिला इतकी प्रेरणा मिळाली की, तिने अवघ्या अडीच तासात ते संपूर्ण पुस्तक वाचले. तेव्हापासून तिच्या मनात अध्यात्म जाणून घेण्याची अधिक इच्छा निर्माण झाली होती 2010 मध्ये तिच्या एका मित्राने तिला कोयंबटूरमध्ये असलेल्या आश्रमबद्दल सांगितलं. गेली अनेक वर्ष ती तिथेच राहात होती. तिथं राहून ती विपश्यना शिकली. यानंतर ती काही काळ लदाख येथेही गेली होती. या दरम्यान तिनं केशवपना केली होती. आश्रमात राहत असताना तनुश्रीनं स्वत:ला ओळखलं. अन् आता ती पूर्ण आत्मविश्वासानं बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याची तयारी करत आहे.

    First published:

    Tags: Bollywood, Entertainment, Miss india, Nana patekar, Sexual assault