Home /News /entertainment /

अभिनेत्याचा सुपरफॅन काळाच्या पडद्याआड; आत्महत्येच्या घटनेमुळं माजली खळबळ

अभिनेत्याचा सुपरफॅन काळाच्या पडद्याआड; आत्महत्येच्या घटनेमुळं माजली खळबळ

अभिनेत्याच्या लाखो चाहत्यांपैकी एकानं आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवलं. या सुपरफॅनच्या आत्महत्येमुळं सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. यानं आपल्या संपूर्ण शरीरावर अभिनेत्याच्या नावाचे टॅटू गोंदवले होते.

    मुंबई 25 फेब्रुवारी: 'विश्वासम', 'वेदालम', 'वीरम' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेला अजित कुमार (Tamil superstar Ajit Kumar) हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याचा प्रत्येक चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहाबाहेर चाहत्यांची रांग लागते. अनेक चाहते तर एखाद्या देवाप्रमाणेच त्याची पूजा करतात. दरम्यान आजितच्या लाखो चाहत्यांपैकी एकानं आत्महत्या केली आहे. (commits suicide) पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मात्र आत्महत्येच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव प्रकाश असं होतं. तो अजितचा इतका मोठा फॅन होता, की त्यानं आपल्या शरीरावर आवडत्या अभिनेत्याचे फोटो आणि नावाचा टॅटू कोरला होता. शिवाय अजितचा कुठलाही नवा चित्रपट प्रदर्शित झाला की त्या चित्रपटाचं नाव तो आपल्या अंगावर कोरत असे. प्रकाशला सोशल मीडियावर सुपरफॅन म्हणून ओळखलं जायचं. परिणामी त्याच्या आत्महत्येमुळं एकच खळबळ उडाली आहे. अवश्य पाहा - ‘Slumdog Millionaire’मधील खलनायकावर लैंगिक अत्याचाराचे आरोप प्रकाशने आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कुठल्यातरी कौटुंबीक कारणामुळं त्यानं आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. दरम्यान अजितच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे या सुपरफॅनला श्रद्धांजली वाहिली आहे. यापूर्वी KGF स्टार यशच्या चाहत्यानं केली आत्महत्या केली होती. हा व्यक्ती नैराश्येत असल्यामुळं त्याने आत्महत्येचं पाऊल उचललं होतं.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Ajith kumar, Entertainment, Fan committed suicide, South indian actor, Suicide, Tattoo

    पुढील बातम्या