तैमूर झाला 'मास्टर शेफ' सैफ आणि करीनासाठी बनवला हा पदार्थ

तैमूर झाला 'मास्टर शेफ' सैफ आणि करीनासाठी बनवला हा पदार्थ

चिमुरडा तैमूर (Taimur) पाककलेचे धडे घेत असताना सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) त्याच्याकडे कौतुकाने पाहातच राहिले.

  • Share this:

मुंबई, 02 डिसेंबर: अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan)आणि करिना कपूर-खान (kareena Kapoor Khan) आपला मुलगा तैमूर अली खानसोबत (Taimur Ali Khan) नुकतेच धर्मशालातील (Dharamshala) एका हॉटेलमध्ये उतरले होते. त्यावेळी आपल्या सुट्टीचा आनंद घेताना दिसले. त्यावेळी त्यांनी बरेच फोटो आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले. मुंबईत येण्यापूर्वी ग्रँड हयात हॉटेलच्या वतीने मास्टर तैमूरसाठी खास पाक कलासाठी सेशन आयोजित केलं होतं. तैमूरने शेफची टोपी परिधान केली होती. यावेळी छोटा तैमूर आई-वडिलांना कप केक करून देतानाचे फोटो त्या हॉटेलच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले. त्या टेबलावर सैफ अली खान करिना कपूर व तैमुर बसलेले होते व हॉटेलचा स्टाफ त्यांना मदत करत होता.

फोटोमध्ये तैमूर वितळलेले चॉकलेट  छोट्या साच्यामध्ये भरून चॉकलेट कप केक तयार करताना दिसला. व त्यासोबतच चॉकलेट केक खातानाही दिसून आला. तैमूरचा हा भातुकलीचा खेळ त्याचे आईबाबा लक्षपूर्वक कौतुकाने बघत होते. तसेच यावेळी करीनाने ब्लॅक हुडी आणि मॅचिंग ट्रॅक पॅन्ट घातली होती. दरम्यान सैफने कुर्ता पायजमा परिधान केला होता. त्यावर काळा कोटही होता तर तैमूरने राखाडी कलरचा शर्ट आणि पॅंट घातली होती. हयातने इंस्टाग्रामवरील या पोस्टमध्ये लिहिलं होतं, ‘मास्टर तैमुर अली खान आणि त्याच्या कुटुंबासाठी आमच्यातर्फे आयोजित विशेष स्वयंपाकाच्या सेशनची (Culinary Session) ही झलक. तसेच या पोस्ट द्वारे हॉटेलने सैफ अली खान व करीना कपूर खान यांना धन्यवाद दिले.

अलीकडेच करीना आणि तैमुर धर्मशाला येथे सैफ अली खानसोबत दिवाळी साजरी करायला गेले होते. सैफ अली खान त्याच्या 'भूत पोलीस' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आधीच तिथे पोचला होता व  त्याच्यासोबत या दिवसांचा आनंद घेता यावा यासाठी करीना आणि तैमुर सुद्धा तिथे पोहोचले. त्यावेळी करीनाची मैत्रीण मलायका अरोरा खान (Malaika Arora Khan) तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर(Arjun Karpoor) याच्यासोबत या हिल स्टेशनवर आली होती. अर्जुनही या चित्रपटात काम करत आहे. तसेच या चित्रपटात यामी गौतम (Yami Gautam) आणि जॅकलीन फर्नांडिस(Jacqueline Fernandez) या अभिनेत्रीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 2, 2020, 6:42 PM IST

ताज्या बातम्या