Home /News /entertainment /

रुपाली चाकणकरांच्या हस्ते लेकाच्या सिनेमाच्या पोस्टरचं अनावरण, शिल्पा ठाकरे-सोहम पहिल्यांदाच दिसणार एकत्र

रुपाली चाकणकरांच्या हस्ते लेकाच्या सिनेमाच्या पोस्टरचं अनावरण, शिल्पा ठाकरे-सोहम पहिल्यांदाच दिसणार एकत्र

'तू आणि मी, मी आणि तू' (tu aani mee mee aani tu ) या मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याहस्ते या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

पुढे वाचा ...
    मुंबई, 25 मे - बऱ्याच कवी-साहित्यिकांनी आपापल्या भाषांमध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे प्रेम नेमकं असतं तरी कसं हे विचारलं तर ते कोणालाही ठामपणे सांगता येणं शक्य नाही. कारण प्रेम ही भावना आहे, ज्याचा प्रत्येकव्यक्तीला एक वेगळा अनुभव असतो. त्यामुळे हे सोप्प वाटणार प्रेम अजिबात नाही त्यात येणारी वादळे कधी दिशा भरकटवतील हे सांगणाऱ्या 'जैन फिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत 'तू आणि मी, मी आणि तू' (tu aani mee mee aani tu ) या मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर  (Rupali Chakankar) यांच्याहस्ते या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या चित्रपटातून रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम (Soham Chakankar) चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. सोहमच्या वाढदिवशी आई मुलाची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाच्या पोस्टरचे त्याच्या आईच्या म्हणजेच रुपाली चाकणकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच प्रेमालाही आहेत. प्रेम करणं ते टिकवणं आणि निभावणं या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाहीत याची जाणीव या चित्रपटातून अभिनेत्री शिल्पा ठाकरे आणि अभिनेता सोहम चाकणकर यांच्या फ्रेशजोडीने करून दिली. शिल्पाने आजवर बऱ्याच मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या असून सोहम या चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पाऊल टाकत आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता शिल्पा आणि सोहमची लव्हेबल केमिस्ट्री कशी असेल याचा अंदाज येतोय. 'जैन फिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत निर्माते सागर जैन, ऋषभ कोठारी, राजू तोडसाम निर्मित आणि दिग्दर्शक कपिल जोंधळे दिग्दर्शित 'तू आणि मी, मी आणि तू' या चित्रपटाची कथा लेखक नितीन सूर्यवंशी लिखित आहे. तर चित्रपटाचे संगीताची बाजू संगीतकार प्रशांत सातोसे यांनी सांभाळली आहे, तसेच या चित्रपटाचा उत्तम असा कॅनव्हास व्यंकेट कुमार यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. वाचा-'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेला मिळाला मोठा पुरस्कार, म्हणाला, 'याच्या लायक मी..' प्रेमाची आगळीवेगळी कथा घेऊन येत शिल्पा आणि सोहमची जोडी रसिक प्रेक्षकांवर राज्य करण्यास 'तू आणि मी, मी आणि तू' या चित्रपटातून सज्ज झाली आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीच शिगेला पोहोचली आहे, असे असताना लवकरच नव्या जोमाने हा चित्रपट सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला येत आहे. आजच्या या कार्यक्रमादरम्यान रुपाली चाकणकर असे म्हणाल्या की,"सर्वप्रथम सोहमला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि टीम यांचे मनापासून आभार की माझ्या मुलाला या क्षेत्रात पदार्पण करण्याची संधी त्यांनी दिली. राजकारणात मला कोणताही वारसा नसताना मी जशी या क्षेत्रात उतरले तसेच माझ्या मुलाने सोहमने चाकणकर कुटुंबातील कोणीही या क्षेत्रात नसताना अभिनयक्षेत्रात स्वकर्तृत्वावर करिअर करण्याचा निर्णय घेतला. माझे बॅग्राऊंड राजकीय असल्याने, शूटिंग दरम्यान सोहमने मला एक विनंती केली की, तू चुकूनही सेटवर येऊ नको कारण तू जर सेटवर आलीस तर संपूर्ण टीमला राजकीय दबावाच दडपण येईल आपण ही क्षेत्र वेगवेगळी ठेवू असे त्याने मला सांगितले, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment

    पुढील बातम्या