Home /News /entertainment /

'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेला मिळाला महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडू मोठा पुरस्कार, म्हणाला, 'याच्या लायक मी..'

'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेला मिळाला महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडू मोठा पुरस्कार, म्हणाला, 'याच्या लायक मी..'

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्याने नुकतीच एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबच शेअर केली आहे.

  मुंबई, 25 मे- महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्याने नुकतीच एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबच शेअर केली आहे. नुकताच गौरवला एका पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला आहे. या पुरस्कराबद्दलची माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते गौरवला भिमरत्न हा पुरस्कार देण्यात आला आहे. ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करत गौरव म्हणाला की, ''भिमरत्न पुरस्कार सोहळा २०२२. खरच मी या पुरस्काराच्या लायक आहे की नाही अजुनही कळत नाहीये. सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकुन देणारयांसाठीचा हा पुरस्कार सोहळा आहे.आणि त्यांच्याच बरोबरीने आपल्यासारख्याला पण एवढा मोठा मान आपण दिलात. खूप आभारी आहे.'' वाचा-परीच्या आईचं सत्य येणार आजोबांसमोर; नेहाला बसणार मोठा धक्का, वाचा आजचे हायलाईट्स ''महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात आला. सोबत महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंद शिंदेसाहेब, मिलिंद शिंदेसाहेब आणि मधुर शिंदे उपस्थित होते. धर्मात्मा फाउंडेशनचे खूप खूप आभार मानतो.सर्व प्रेकक्षकांचे आभार मानतो. धन्यवाद @pankajchandanshive @milind.jagtap7171 आणि सचिन घूमरे दादा ❤️..''गौरव मोरेच्या या पोस्टवर चाहत्यांसब सेलेब्सकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
  ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून गौरवने टीव्ही विश्वात पदार्पण केलं. या मालिकेत तो विनोदी भूमिका करत होता. पण त्याला खरी ओळख मिळाली ती महाराष्ट्राची हास्यजत्रामधून.यामुले तो महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला. गौगवनं संजू, कामयाब, झोया फॅक्टर या चित्रपटात देखील काम केलं आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या