मुंबई, 20 जून : सब टीव्हीवरील लोकप्रिय शो तारक मेहता का उल्टा चष्मा (Tarak Mehta Ka Oolta Chashma) बाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मागच्या काही काळापासून या शोमध्ये प्रमुख भूमिकेत असलेली अभिनेत्री दिशा वकानीच्या शोमध्ये परत येण्याबाबत उलट सुलट अंदाज लावले जात आहे. सध्या हा शो प्रेक्षकांनी खूप लोकप्रियता मिळवत असला तरीही प्रेक्षकांना दिशाच्या शोमध्ये परतण्याची वाट पाहत आहे. अशातच सध्या दिशा वकानीचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिशा म्हणजेच दयाबेन बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत इंग्लिशमध्ये बोलताना दिसत आहे. जे ऐकल्यावर ‘बिग बी’सुद्धा गोंधळलेले दिसतात. World Refugee Day निर्वासित मुलांसाठी प्रियांका चोप्राचं भावनिक आवाहन सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला दयाबेनचा हा व्हिडिओ काही वर्षांपूर्वीचा आहे. ज्यावेळी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे कलाकार दिशा वकानी आणि दिलीप जोशी यांनी अमिताभ बच्चन यांचा शो ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी दिशा आणि दिलीप यांनी त्यांच्या खास अंदाजात प्रेक्षकांचं मनोरंजनही केलं होतं तसेच ते अमिताभ बच्चन यांच्यासोबत मस्ती करताना दिसले होते. या शोमध्ये अमिताभ यांनी दयाबेनला, तुम्हाला इंग्रजीची विशेष आवड असल्याचं मी ऐकलं आहे त्यामुळे आता तुम्ही आम्हाला इंग्लिशमध्ये बोलून दाखवणार का असं विचारलं होतं. त्यावर दिशा म्हणते, इंग्लिशमध्ये तर मला बरंच काही येतं कुठून सुरुवात करू. त्यावर दिलीप तिला ए पासून सुरू करायला सांगतात आणि त्यानंतर जे काही होतं ते ऐकण्यासाठी हा व्हिडिओ एकदा पाहाच
या व्हिडिओच्या शेवटी अमिताभ बच्चन दिशाला, तुम्ही काय बोललात हे मला अजिबात समजलेलं नाही असं सांगातात. यावर दिशा म्हणते, मी तर बोलले. पण जर हे तुम्हाला समजलं नाही तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. यावर उपस्थित दर्शकांमध्ये एकच हाशा पिकतो. मागच्या काही काळापासून दिशा वकानी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’पासून दूर आहे. बहीण सुनैनाच्या आरोपांनंतर हृतिकच्या मदतीला धावून आली एक्स वाइफ सुजैन खान प्रेग्नंसी लिव्ह असलेल्या दिशानं शोमध्ये परत येण्यासाठी मानधन म्हणून मोठी रक्कम मागितल्यानं निर्माता आणि दिशामध्ये वाद सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान दिशा लवकरच या शोमध्ये वापसी करणार असल्याच बोललं जात होतं मात्र अद्याप याबाबत दिशा किंवा शोच्या निर्मात्यांकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे सध्या तरी प्रेक्षकांकडे दिशाच्या शोमध्ये परतण्याची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कपिल शर्मासोबत काम केलेल्या या छोट्या कॉमेडियनला तुम्ही ओळखलं का ? ====================================================== VIDEO : सेटवर घुसून कलाकारांना रॉडने मारहाण, माही गिलला दुखापत