S M L

'तारक मेहता...'च्या कलाकारांना मोठा धक्का, दिवसाचे शुटिंग केले रद्द

कुमार आझाद हे त्यांच्या वाढत्या वजनामुळे अधिक त्रस्त झाले होते

Updated On: Jul 9, 2018 02:53 PM IST

'तारक मेहता...'च्या कलाकारांना मोठा धक्का, दिवसाचे शुटिंग केले रद्द

मुंबई, 09 जुलैः 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील डॉ. हंसराज हाथी फेम कवी कुमार आझाद यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना वोकार्ड रुग्णालयात भरती करण्यात आले होते. पण आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लवकरच ही मालिका 10 वर्ष पूर्ण करणार आहे. याचसंदर्भात मालिकेच्या सेटवर आज एक मीटिंग होणार होती. या मालिकेतील सर्व कलाकार एखाद्या कुटुंबाप्रमाणेच राहत असल्यामुळे आपल्या जिवलग मित्राचे झालेले आकस्मित निधन सर्वांच्याच जिव्हारी लागले. म्हणूनच आज सर्वांनी मिळून मालिकेचे चित्रीकरण रद्द केले.

कवी कुमार यांनी बॉलिवूडमधील काही सिनेमांमध्ये काम केले आहे. 2000 मध्ये आलेल्या आमिर खान आणि ट्विंकल खन्ना यांच्या 'मेला' सिनेमात त्यांनी काम केले होते. फार कमी लोकांना माहीत आहे की ते उत्तर कविताही करतात. कुमार आझाद या त्यांच्या नावापुढे वापरण्यात आलेला कवी शब्द हा त्याच आशयाने होता.

कुमार आझाद हे त्यांच्या वाढत्या वजनामुळे अधिक त्रस्त झाले होते. त्यांचे वजन सुमारे 215 किलो एवढे होते. आपलं वजन कमी करण्यासाठी ते अनेक उपायही करत. 2010 मध्येही त्यांनी शस्त्रक्रिया करुन आपले वजन कमी केले होते. त्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणाही होत होती. मात्र दरम्यानच्या काळात वजन वाढण्यामुळे ते पुन्हा चिंता ग्रस्त असायचे.

हेही वाचाः

अशा पद्धतीने डॉ. हाथी फेम कवी कुमार यांनी वजन केले होते कमी

Loading...
Loading...

... म्हणून 'सेक्स टॉक'साठी एक्स- प्रियकराच्या कुटुंबियांचे तयार केले FB अकाऊंट

अवघ्या 11 दिवसांत कोर्टाने दिली 75 वर्षीय पतीला जन्मठेपेची शिक्षा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2018 02:19 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close