Home /News /entertainment /

एकदाचं ठरलं ! निर्मात्याने अखेर सांगूनच टाकलं कधी होणार 'तारक मेहता'मध्ये दयाबेनची एंट्री

एकदाचं ठरलं ! निर्मात्याने अखेर सांगूनच टाकलं कधी होणार 'तारक मेहता'मध्ये दयाबेनची एंट्री

तारक मेहता का उलटा चष्मा शोमध्ये 'दयाबेन'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी शोमध्ये कधी परतणार ?, यावर आता निर्माते असित कुमार मोदी यांनी मौन सोडलं आहे.

    मुंबई, 16 जून : छोट्या पडद्यावर झळकणारी तारक मेहता का उलटा चष्मा मालिका (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) नेहमीच चर्चेचा विषय असते. देशातील घराघरात पाहिली जाणारी तारक मेहता का उलटा चष्मा मालिका 2008 पासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील एका ना एका पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. प्रत्येक पात्राची एक वेगळी अशी ओळख निर्माण झाली आहे. या शोमध्ये 'दयाबेन'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी (Actress Disha Vakani) 2018 पासून शोमधून गायब आहे. दिशाच्या पुनरागमनाची चाहते  ( Dayaben Return)  आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्री दिशा वकानी आई झाल्यापासून ब्रेकवर आहे. गेल्या काही दिवसांपासून लोक अपेक्षा करत आहेत की लवकरच दयाबेनची एंट्री शोमध्ये होईल. प्रोमोजमधून दयाबेन परत येण्याची अपेक्षा आहे पण दयाबेन परत येत नाही. त्यामुळे चाहतेही नाराज झाले आहेत आणि निर्मात्यांना ट्रोल करत आहेत. नुकताच या शोचा एक प्रोमो रिलीज झाला होता ज्यामध्ये 'दयाबेन' परत येत असल्याचे संकेत देण्यात आले होते. तेव्हापासून अनेक लोक सोशल मीडियावर म्हणत आहेत की शोचे निर्माते त्यांना मूर्ख बनवत आहेत. हे ही वाचा - Khatron ke Khiladi 12: टास्कदरम्यान टीव्ही अभिनेत्री गंभीर जखमी; शरीरावरील जखमा पाहून चाहते चिंतेत या सर्व ट्रोलिंगवर शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिशा वकानीचे शोमध्ये पुनरागमन शक्य वाटत नाही, म्हणूनच तो दयाबेनच्या पात्रासाठी नवीन चेहऱ्यांसाठी ऑडिशन घेत आहे.आता ही गोष्ट कथेची आहे. आम्ही सर्व काही ठीक करत आहोत पण थोडा वेळ लागेल. मी मान्य करतो की लोक शोमध्ये भावनिकरित्या जोडलेले असल्यामुळे लोक आम्हाला शिवीगाळ करत आहेत. वाचा-KKK: टास्कदरम्यान टीव्ही अभिनेत्री गंभीर जखमी; शरीरावरील जखमा पाहून चाहते चिंतेत दरम्यान, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाची प्रचंड लोकप्रियता आहे. तसेच मालिकेतील कलाकार  हे  प्रेक्षकांना आपले वाटतात. गेल्या 14 वर्षांपासून या मालिकेने सर्वांना खूप हसवलंय.
    Published by:Sayali Zarad
    First published:

    Tags: Dayaben, Dayaben returns, Entertainment, Tarak mehta ka ooltah chashmah, TV serials

    पुढील बातम्या