या व्हायरल फोटोमध्ये अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर एक समाधानकारक हास्य आहे. त्यावरून असा अंदाज बांधला जात आहे की, अभिनेत्री टास्कमधील तिच्या परफॉर्मन्सवर ती प्रचंड खूश आहे. नेटकरी तिच्या धाडसाचं कौतुक करत आहेत. विशेष म्हणजे या स्टंट शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी ती आजारी होती. अभिनेत्रीची ही दुखापती पाहून ती खरी खेळाडू असल्याचं चाहते म्हणत आहेत. मात्र अनेकांना तिच्या तब्येतीची काळजी वाटत आहे. अभिनेत्रीचा हा फोटो सध्या चांगलाच चर्चेत आहे. (हे वाचा:अभिनेता करणवीर बोहरावर गुन्हा दाखल, महिलेकडून गंभीर आरोप) मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'कनिकाला वाटतं की 'प्रयत्न न करणं' ही तिची सर्वात मोठी भीती आहे. ती म्हणते, 'मी एक अशी व्यक्ती आहे की जिला नेहमीच आपलं सर्वोत्तम देणं आवडतं. यामुळे मला एक व्यक्ती म्हणून प्रचंड आनंद होतो.'' ती पुढे म्हणते की 'खतरों के खिलाडी 12' मध्ये तिला वेगवेगळे स्टंट करताना पाहण्यासाठी तिचे मित्र आणि कुटुंबीय उत्सुक आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit Shetty, Tv actress, Tv shows