जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / जेठालालचं तारक मेहतासोबत झालं भांडण?; अभिनेत्यानं सांगितलं मतभेदाचं कारण...

जेठालालचं तारक मेहतासोबत झालं भांडण?; अभिनेत्यानं सांगितलं मतभेदाचं कारण...

जेठालालचं तारक मेहतासोबत झालं भांडण?; अभिनेत्यानं सांगितलं मतभेदाचं कारण...

तारक मेहता आणि जेठालाल यांच्यात सध्या जोरदार भांडण सुरु असल्याची चर्चा आहे. त्यांचं भांडण इतकं वाढलं आहे की दोघं एकमेकांसमोर उभे देखील राहायला नकार देतात. (Tarak Mehta and Jethalal) पण खरंच त्यांच्यात भांडण आहे की या निव्वळ केवळ अफवा आहेत?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 27 मार्च: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका नेहमीच चर्चेत असते. परंतु गेल्या काही काळात ही मालिका आपल्या विनोदापेक्षा इतर कारणांमुळेच अधिक चर्चेत राहू लागली आहे. आधी कोरोनाचं संक्रमण अन् आता मुख्य कलाकारांमध्ये सुरु असलेली भांडणं यामुळं निर्माते त्रस्त असल्याची चर्चा आहे. होय, रुपेरी पडद्यावर घनिष्ठ मित्र असल्याचा दावा करणारे तारक मेहता आणि जेठालाल यांच्यात सध्या जोरदार भांडण सुरु असल्याची चर्चा आहे. त्यांचं भांडण इतकं वाढलं आहे की दोघं एकमेकांसमोर उभे देखील राहायला नकार देतात. (Tarak Mehta and Jethalal) पण खरंच त्यांच्यात भांडण आहे की या निव्वळ केवळ अफवा आहेत? मालिकेत तारक मेहता ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता शैलेश लोढा यानं दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत जेठालाल अर्थात अभिनेता दीलिप जोशीसोबत सुरु असलेल्या वादावर भाष्य केलं. तो म्हणाला, “दीलिप आणि माझ्यात खूप चांगली मैत्री आहे. आमची भांडणं झालेली नाहीत. या निव्वळ अफवा आहे. हे खरं आहे अधून-मधून एखाद्या सीनवरुन आमच्यात मतभेद होतात. पण तो सीन अधिक चांगल्या प्रकारे लोकांसमोर सादर व्हावा यासाठी तो प्रयत्न असतो. दीलिपजी अत्यंत खुशालचेंडू आयुष्य जगणारे व्यक्ती आहेत. आपल्या सहकलाकारांना मदत करण्यासाठी ते कायम पुढे असतात. अन् अशा कलाकारासोबत कोणी का भांडण करेल. कदाचित आम्हाला दोन वेगवेगळ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाताना कोणीतरी पाहिलं असेल त्यावरुन हा निष्कर्ष काढला गेलाय. आम्ही एक टीम आहोत कृपया आमच्या मैत्रीबद्दल अशा अफवा पसरवू नका.” अशी विनंती शैलेश लोढानं या मुलाखतीदरम्यान केली. अवश्य पाहा - कसं सूचलं ‘आंटीची घंटी’ गाणं; पाहा मिलिंद शिंदेंचा भन्नाट किस्सा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेली 13 वर्ष सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंन करत आहे. जेठालाल आणि तारक मेहता यांच्यातील मैत्री हे या मालिकेतील मुख्य भाग आहे. जेठालालवर कुठलही संकट कोसळलं की तो तारक मेहताचा दरवाजा ठोठावतो. अन् मग दोघे मिळून संकटाचा सामना करतात. या पार्श्वभूमीवर चाहते या मालिकेबाबत चिंतेत होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात