जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कसं सूचलं ‘आंटीची घंटी’ गाणं; पाहा मिलिंद शिंदेंचा भन्नाट किस्सा

कसं सूचलं ‘आंटीची घंटी’ गाणं; पाहा मिलिंद शिंदेंचा भन्नाट किस्सा

कसं सूचलं ‘आंटीची घंटी’ गाणं; पाहा मिलिंद शिंदेंचा भन्नाट किस्सा

‘घंटी वाजवली आंटीची’ (Antichi Ghanti Vajavali) हे देखील त्यांच्या अशाच अनेक सुपरहिट गाण्यांपैकी एक आहे. हे गाणं त्यांना कसं सूचलं याचा एक भन्नाट किस्सा आहे. हा किस्सा वाचून तुम्ही देखील हसून हसून वेडे व्हाल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 27 मार्च**:** आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे (Anand Shinde Milind Shinde) हे मराठी संगीतसृष्टीतील नामांकित संगीतकार म्हणून ओळखले जातात. ‘जवा नवीन पोपट हा’ (java navin popat ha ) या गण्यामुळं लोकप्रिय झालेल्या या जोडगोळीनं अनेक सुपरहिट लोकगीतं गायली आहेत. त्यांच्या अनेक गाण्यांना तब्बल 20 वर्ष उलटून गेली आहेत मात्र आजही लग्न समारंभापासून डिजे नाईट्सपर्यंत सर्व ठिकाणी ही गाणी वाजताना दिसतात. ‘घंटी वाजवली आंटीची’ (Antichi Ghanti Vajavali) हे देखील त्यांच्या अशाच अनेक सुपरहिट गाण्यांपैकी एक आहे. हे गाणं त्यांना कसं सूचलं याचा एक भन्नाट किस्सा आहे. हा किस्सा वाचून तुम्ही देखील हसून हसून वेडे व्हाल. पाहा काय होता तो किस्सा**?** ‘घंटी वाजवली आंटीची’ या गाण्याचे लिरिक्स मानवेल गायकवाड यांनी लिहिले होते. अन् शिंदे बंधूंनी हे गाणं स्वरबद्ध केलं होतं. किस्सा असा आहे की, मानवेल गायकवाड आपल्या मित्राला भेटण्यासाठी कल्याण येथे गेले होते. त्यांच्या घराशेजारीत एक दारुचा अड्डा होता. या अड्ड्याला आंटीचा अड्डा असं म्हणायचे. एकदा काही पोलिसांनी अड्ड्यावर धाड मारुन सर्व दारु जप्त केली. नंतर कळलं की ते पोलीस खोटे होते. काही गुंडांनी पोलिसांच्या वेशात येऊन आंटीची सर्व दारु लंपास केली होती. हा किस्सा अगदी रंगवून मानवेल यांच्या मित्रानं त्यांना सांगितला. त्यावेळी त्यानं ‘काल रात्री आंटीची घंटी वाजली’ असा शब्द प्रयोग केला होता. अन् हा किस्सा ऐकून त्यांना चक्क एक गाणच सुचलं. काही दिवसात त्यांनी घंटी वाजली आंटीची या गाण्याची निर्मिती केली. अन् हे गाणं तुफान लोकप्रिय झालं. अवश्य पाहा - हिंदी बोलणाऱ्या अँकरला ए. आर. रेहमान यांनी केलं ट्रोल; पाहा Video

आनंद-मिलिंद शिंदे यांनी गायलेली सर्व गाणी अशाच प्रकारची आहेत. ही गाणी सभोवताली घडलेल्या विविध घटनांमधून तयार करण्यात आली आहेत. या गाण्यांमध्ये वास्तवदर्षी आभास असतो. उगाच वाढवून सांगितलेल्या परीकल्पना नसतात म्हणून ती गाणी लोकांना आवडतात असं मानवेल गायकवाड म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात