मुंबई, 22 फेब्रुवारी- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील बालकलाकारांपासून ते वृद्ध अभिनेत्यांपर्यंत सर्वांनाच मोठा चाहतावर्ग आहे. मालिकेका नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडते. दरम्यान मालिकेत अलीकडच्या काही वर्षात बदलही दिसून आले आहेत. काही दिवसांपूर्वी मालिकेत नव्या तारक मेहतांची एन्ट्री झाली आहे. या मालिकेत अभिनेता सचिन श्रॉफने अभिनेता शैलेश लोंढाची जागा घेतली आहे. सचिन प्रेक्षकांना भुरळ पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे.दरम्यान सचिन श्रॉफच्या खाजगी आयुष्याबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मालिका विश्वातील एक ओळखीचा चेहरा म्हणून सचिन श्रॉफकडे पाहिलं जातं. सचिन श्रॉफने नुकतंच छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत एन्ट्री केली आहे. या मालिकेत सुरुवातीपासून अभिनेते शैलेश लोढा यांनी तारक मेहतांची भूमिका साकारली होती. त्यांना प्रेक्षकांचं अफाट प्रेम मिळालं आहे. परंतु निर्मात्यांशी झालेल्या मतभेदानंतर शैलेश यांनी शोला रामराम ठोकला होता. त्यामुळे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले होते. दरम्यान सचिन श्रॉफने या मालिकेत एन्ट्री करत आपला चाहतावर्ग बनवायचा प्रयत्न सुरु केला आहे. (हे वाचा: Sumbul Touqeer: बिग बॉसनंतर सुम्बुल तौकीरचं नशीब चमकलं; हाती लागली मोठी मालिका ) दरम्यान सचिन श्रॉफ आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. टेलीचक्करच्या रिपोर्ट्सनुसार, अभिनेता सचिन श्रॉफ लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या 25 फेब्रुवारीला सचिन विवाह बंधनात अडकणार असल्याचा या रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे. मात्र सचिनकडून अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाहीय. ’ या वृत्तावर विश्वास ठेवला तर सचिन श्रॉफचं हे दुसरं लग्न असणार आहे. कारण यापूर्वीही सचिनचं एक लग्न झालं आहे. ‘‘कुमकुम’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री जुही परमारला अनेक वर्ष डेट केल्यानंतर या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. या जोडप्याला समायरा नावाची एक मुलगीसुद्धा आहे. मात्र लग्नाच्या काही वर्षानंतर या दोघांनी विभक्त होत घटस्फोट घेतला आहे.
टेलीचक्करच्या रिपोर्ट्सनुसार, येत्या 25 फेब्रुवारीला सचिन श्रॉफ लग्नगाठ बांधणार आहे. हा लग्न सोहळा खाजगी पद्धतीने मुंबईत पार पडणार आहे. अभिनेता नेमकं कोणासोबत लग्न करतोय याबाबत कोणताही खुलासा झालेला नाहीय. नव्या तारक मेहतांना पुन्हा एकदा बोहल्यावर चढताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.