मुंबई, 4 फेब्रुवारी- छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक म्हणून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोला ओळखलं जातं. गेल्या चौदा वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दयाबेन, जेठालाल ते तारक मेहतापर्यंत यातील सर्वच पात्र प्रचंड प्रसिद्ध झाले आहेत. दरम्यान काही जुन्या कलाकारांनी या शोला रामराम ठोकला आहे. यातीलच इक कलाकार म्हणजे शैलेश लोढा होय.
अभिनेता शैलेश लोढा यांनी आपल्या खास शैलीने आणि अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे. अलीकडेच शो मेकर्सवर आपलं उर्वरित मानधन न दिल्याचा आरोप करून ते चर्चेत आले होते. त्यानंतर आता शैलेशने सोशल मीडियावर त्याचा एक नवा फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केल आहे. शैलेशला भक्तीमध्ये तल्लीन पाहून चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. तसेच 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये परत येण्याची विनंती करत आहेत.
(हे वाचा:Tunisha Sharma: तुनिषा-शिझान प्रकरणाला नवं वळण; न्यायालयाने पोलीसांनाच केली 'ही' विचारणा )
शैलेश लोढा यांनी नुकतंच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेता भगव्या रंगाच्या वेशभूषेत दिसून येत आहे. तसेच त्यांनी कपाळावर टिळा आणि भस्म लावला आहे. गळ्यात फुलांची माळ घातली आहे. अभिनेता डोळे मिटून ध्यान करण्याच्या मुद्रेत बसलेला दिसून येत आहे. शैलेश मंदिरात बसल्याचं समजतं. शैलेशने हा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'आम्हाला मनाची शक्ती द्या, मनाला जिंकू द्या...'
View this post on Instagram
शैलेशला या अवतारात पाहून चाहते सतत प्रतिक्रिया देत, जय हो, ओम नमः शिवाय, जय श्री राम लिहित आहेत. एका चाहत्याने प्रश्न विचारत लिहलंय की,तुम्ही महाकाल मंदिरात आहात का? तर एकाने लिहलंय, 'तुम्ही गुणांनी परिपूर्ण आहात, तुम्ही लेखक आहात, तुम्ही कवी आहात, तुम्ही अभिनेता आहात आणि तुम्ही काय आहात, सर, तुम्ही एक अद्भुत कलाकार आहात'. तसेच काही नेटकऱ्यांनी संन्यास घेतला का? अशी विचारणा केली आहे. दरम्यान अनेक चाहते शैलेशला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये परत येण्याची विनंती करताना दिसत आहेत.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये तारक मेहताची भूमिका साकारणारा अभिनेता आणि कवी शैलेश लोढा यांनी नुकतंच निर्मात्यांवर त्याचं उर्वरित मानधन न दिल्याचा आरोप केला आहे. शैलेश लोढा यांच्या म्हणण्यानुसार, ते निर्मात्यांच्या सतत संपर्कात आहेत, परंतु त्यानंतरही त्यांना त्यांचं थकलेलं मानधन अद्याप मिळालेल नाही. शैलेशच्या आरोपावर, शोचे प्रोजेक्ट हेड सुहेल रमाणी यांनी पत्रकारांना दिलेल्या निवेदनात सांगितलंय की, अभिनेत्याने शोमधून बाहेर पडण्याची औपचारिकता पूर्ण केली नाही, त्यामुळे त्यांचं थकित मानधन थांबवण्यात आलं आहे. यावर आता शैलेश काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.