मुंबई, 19 मे- छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही विनोदी मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील लोकांना या मालिकेची भुरळ पडली आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराला एक खास ओळख मिळाली आहे. या कलाकारांनी आपल्या अभिनय आणि कॉमेडी टायमिंगच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अलीकडे अनेक जुन्या कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला आहे. त्या अजागी अनेक नव्या कलाकारांनी मालिकेत एन्ट्री घेतली आहे. हे कलाकार कितीही चांगले काम करत असले तरी, प्रेक्षकांच्या मनात जुन्या कलाकारांची जागा घेऊ शकलेले नाहीयेत. त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड सुरु करण्यात आला आहे. यामध्ये तारक मेहतामधील सर्व जुन्या कलाकारांना परत बोलावण्याची मागणी केली जात आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही विनोदी मालिका अनेकांच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनली आहे. गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षक या मालिकेचा आनंद घेत आहेत. या मालिकेत दयाबेन आणि जेठालाल जरी मुख्य केंद्र असले तरी मालिकेची कथा सर्वच कलाकारांभोवती फिरत असते. त्यामुळे मालिकेत सतत काही ना काही मजेशीर किस्से घडतच असतात. मालिकेतील कलाकारांचा विनोदी अभिनय लोकांना पोट धरुन हसायला भाग पाडतो. (हे वाचा: Cannes 2023: ऐश्वर्या रायचा कान्स लुक ठरला फेल?नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, तुम्ही पाहिलंत का फ़ोटो? ) गेल्या काही वर्षांमध्ये मालिकेत प्रचंड बदल झालेले पाहायला मिळाले आहेत. अनेक कलाकारांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने ही मालिका सोडली आहे. त्यांच्या जागी मालिकेत अनेक नवीन कलाकार घेण्यात आले आहेत. मात्र प्रेक्षकांना या मालिकेत त्याच जुन्या कलाकारांना पाहण्याची इच्छा आहे. नुकतंच याची प्रचिती आली आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ ट्रेंड करत आहे. यामध्ये ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील जुन्या कलाकारांना परत आणा अशी मागणी केली जात आहे. हा व्हिडीओ शेअर करत मालिकेचे निर्माता असित मोदी यांनासुद्धा टॅग करण्यात आलं आहे.
इन्स्टाग्रामवर ययीन मत्ता या सोशल मीडिया क्रिएटरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी हातात तारक मेहता मालिकेचे आणि दयाबेन, सोडी, तारक,अंजली अशा शो सोडलेल्या सर्व कलाकारांचे फोटो हातात पकडले आहेत.यावर ‘ब्रिन्ग बॅक तारक मेहता ओल्ड ऍक्टर्स’ असं लिहण्यात आलं आहे. म्हणजेच तारक मेहतामधील जुन्या कलाकारांना परत आणण्याची मागणी केली जात आहे. हे पाम्पलेट हातात पकडून हे तरुण सार्वजनिक ठिकाणी उभे आहेत. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
मालिकेतील मुख्य केंद्र असणाऱ्या दयाबेन अर्थातच दिशा वकानीने आपल्या प्रेग्नन्सी काळात या मालिकेतून ब्रेक घेतला होता. मात्र चार-पाच वर्षानंतर अद्याप ती मालिकेत परतलेली नाहीय. तर दुसरीकडे शैलेश लोढा, नेहा मेहता, गुरुचरण सिंग, भव्या गांधी, निधी भानुशाली अशा अनेक कलाकारांनी मालिका सोडली आहे. तर दुसरीकडे मिसेस सोधी अर्थातच जेनिफर मेस्त्रीने निर्मात्यांवर गंभीर आरोप करत खळबळ माजवली आहे.