मुंबई, 19 मे- प्रत्येक आंतरराष्ट्रीय इव्हेन्टमध्ये भारतीयांच्या नजरा
ऐश्वर्या राय
, दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा, उर्वशी रौतेला, आलिया भट्ट या अभिनेत्रींनकडे लागलेल्या असतात. विदेशी कार्यक्रमांमध्ये या अभिनेत्रींचा जलवा सतत पाहायला मिळतो. सध्या कान्स फेस्टिव्हल सुरु आहे.
कान्स 2023
सुरु झाल्यापासून सर्वांचे डोळे ऐश्वर्या राय बच्चनचा लूक पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर 16 मेपासून सुरु झालेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी ऐश्वर्या राय नेहमीपेक्षा वेगळ्या अंदाजात दिसून आली. यावेळी ऐश्वर्याने आपला स्टाईल स्टेटमेंट पूर्णपणे वेगळा ठेवला होता. यावेळी ऐश्वर्याने काळ्या गाऊनसोबत मोठा सिल्व्हर हुड कॅरी केला होता. ऐश्वर्याचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल 16 ते 27 मे दरम्यान चालणार आहे. यादरम्यान अनेक भारतीय सेलिब्रिटी या फेस्टिव्हलला हजेरी लावत आहेत. मात्र सर्वांच्या नजरा ऐश्वर्या रायकडे लागल्या होत्या. ऐश्वर्याचे चाहते तिच्या रेड कार्पेट लूकची आतुरतेने वाट पाहात होते. अखेर कान्समधून ऐश्वर्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. हा लुक पाहून चाहत्यांनी तिला प्रोत्साहन दिलं असलं तरी नेटकऱ्यांनी मात्र जोरदार खिल्ली उडवली आहे. ऐश्वर्याने यंदा आपल्याला निराश केल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. ‘इंडियाना जोन्स अँड डायल ऑफ डेस्टिनी’च्या स्पेशल स्क्रिनिंगला ऐश्वर्या पोहोचली होती. (हे वाचा:
Alia Bhatt: रिकामी Gucci बॅग घेऊन विदेशी इव्हेंटमध्ये पोहोचली आलिया, बॅग आणि सँडलची किंमत ऐकूनच फुटेल घाम
) ऐश्वर्या राय कान्ससाठी प्रत्येक वेळी फॅशनबाबत नवनवीन प्रयोग करत असते. यावेळीही तिने आपल्या लूकने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. 76व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी तिने काळ्या रंगाचा सोफी कॉचर गाऊन परिधान केला होता. यासह, तिने तिच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून एक मोठा चांदीचा हुड परिधान केला होता. माहितीनुसार, या हुडमध्ये हलके अल्युमिनियम वापरण्यात आले होते. ऐश्वर्याने नेहमीप्रमाणे आपले केस उघडे ठेवले होते. परंतु ऐश्वर्याचा हा लूक फेल ठरल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. कन्समधून ऐश्वर्या रायचे फोटो समोर येताच नेटकऱ्यांनी जोरदार कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. एकाने कमेंट करत लिहलंय, ‘या अभिनेत्रींना झालंय तरी काय? फॅशन म्हणून काहीही करतात’. तर दुसऱ्या एकाने लिहलंय, ‘नॉर्मल का काही घालू शकत नाहीत हे लोक? विचित्र दिसणं गरजेचं आहे का?’, तर तिसऱ्या एकाने लिहलंय, ऐश्वर्याचा हा लूक पूर्णपणे फसलाय’.
तर काहींनी अभिनेत्रीच्या हेअरस्टाईलची खिल्ली उडवली आहे. कितीदिवस एकच हेअरस्टाईल कॅरी करणार? काहीतरी नवीन कर असा सल्ला नेटकऱ्यांनी दिला आहे. तर काहींनी थेट लिहलंय, तुला आणि तुझ्या लेकीला खरंच एका चांगल्या हेअरस्टायलिस्टची गरज आहे’. एकंदरीतच नेटकऱ्यांनी ऐश्वर्याच्या कान्स लूकवर नाराजी व्यक्त केली आहे.