मुंबई, 30 डिसेंबर- 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेने प्रेक्षकांना हसवून लोटपोट केलं आहे. तब्बल 14वर्षांपासून या विनोदी मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मालिकेतील कलाकारांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) होय. दिलीप जोशी यांनी या मालिकेत 'जेठालाल' (Jethalal) ही प्रसिद्ध भूमिका साकारली आहे. त्यांच्या निरागस विनोदाने आणि हटके अंदाजने चाहत्यांना त्यांच्या प्रेमात पाडलं आहे. या मालिकेमुळे ते घराघरात पोहोचले आहेत. त्यांच्याशिवाय ही मालिका असा विचारच प्रेक्षक करू शकत नाही. परंतु काही दिवसांपासून ते मालिका सोडणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे चाहते चिंतेत आहेत.
'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही विनोदी मालिका आज सर्वांच्या पसंतीची बनली आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत या मालिकेचे चाहते आहेत. एक दोन वर्षे नव्हे तर तब्बल 14 वर्षांपासून ही मालिका सुरु आहे. छोट्या पडद्यावरील सर्वात जास्त चालणारा शो म्हणून या मालिकेला ओळखलं जातं. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अतरंगी अंदाजाने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. जेठालाल, दयाबेन,तारक, बबिता, पोपटलाल, भिडे, सोढी अशा सर्वांनीच चाहत्यांचं मन जिंकलं आहे. त्यातल्या त्यात प्रेक्षकांना जेठालाल आणि दयाबेन या जोडीचा हटके अंदाज जास्तच पसंत आहे. त्यामुळे चाहते त्यांना नेहमीच मालिकेत बघण्याचा अट्टाहास करतात.
परंतु असं असतानाही मालिकेतून दयाबेन अर्थातच दिशा वकानीने मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यावेळी ती गर्भवती असल्याने तिनं हा निर्णय घेतला होता. आता तब्बल 4-5 वर्षे झाली तरी दयाबेन मालिकेत परतली नाही. त्यामुळे चाहते नाराज आहेत. अशातच आता जेठालालसुद्धा मालिकेला रामराम करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे सर्वांचं आश्चर्य वाटत आहे.आता या सर्वांवर अभिनेते दिलीप जोशी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे, की 'मला वाटतं आता ही मालिका फारच उत्तम सुरु आहे. असं असताना दुसऱ्या एखादया गोष्टीसाठी मी याला का सोडू'. त्यांनी पुढं म्हटलं,'या मालिकेने आम्हाला खूप काही दिलं आहे. मालिकेमुळे आम्हाला प्रचंड प्रेम मिळालं आहे.त्यामुळे आम्ही या मालिकेला खराब करण्याचा विचार नाही करू शकत'.
(हे वाचा:OMG! ना जिम ना योग जेठालालनं घटवलं 10 किलो वजन; चाहत्यांना सांगितलं ... )
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, या मालिकेत काम करण्यापूर्वी एक वर्षापेक्षा अधिक काळ जेठालाल अर्थातच दिलीप जोशी बेरोजगार होते. त्यांच्याकडे कोणतंही काम नव्हतं. याबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं, 'मी वर्षापेक्षा जास्त काळ बेरोजगार होतो. मी ज्या मुलींसाठी काम करत होतो. ती बंद झाली होती. माझ्याकडे दुसरं कोणतंही काम नव्हतं. माझयासाठी हा काळ फारच कठीण होता. त्यावेळी मला काहीच समजत नव्हतं. मी काय करावं? कुठे जावं? किंवा हे क्षेत्रच बदलावं का? असे अनेक प्रश्न माझ्याकडे होते. अशातच मला 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेची ऑफर मिळाली. आणि माझं आयुष्य पालटलं. त्यानंतर मी कधीच मागे वळून पाहिलं नाही'.
(हे वाचा: 'Taarak Mehta..' फेम जेठालाल लवकरच बनणार सासरे; लग्नात दयाबेनची ...)
एक काळ असा होता, जेव्हा दिलीप जोशी बॅकस्टेजला काम करत होते. त्यांनी एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला होता. त्यांनी म्हटलं होतं, 'मला कोणीही काम देत नव्हतं. मला बॅकस्टेजला काम करावं लागत होतं. मला प्रत्येकवेळी 50 रुपये मिळत असत. परंतु एकेदिवशी चांगली भूमिका मिळेल या आशेवर मी काम करत होतो. मला थियेटरची प्रचंड आवड होती. मी चांगल्या भूमिकेची प्रतीक्षा करत होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Tarak mehta ka ooltah chashmah, Tv serial