मुंबई 14 मे**:** ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या सुपरहिट विनोदी मालिकेत बबिता ही व्यक्तिरेखा साकारुन घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी तिनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिनं जातीवाच शब्दांचा उल्लेख करत अपमानजनक वक्तव्य केलं होतं. यामुळं तिच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन् या प्रकरणी अटक झाल्यास तिला जामीन मिळणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
First information report has been registered against the actress Munmun Dutta @ Babita ji at police station City Hansi under section 3(1) (u) of SC ST POA act.
— Rajat Kalsan رجت کلسن (@rajatkalsan3010) May 13, 2021
Complaint is got registered by dalit rights activist Rajat kalsan. pic.twitter.com/Z7ZTfZXa54
HBD Manushi Chhillar: या प्रश्नाचं उत्तर देऊन मेडिकल स्टुडंट झाली Miss World नॅशनल अलायंल फॉर दलित ह्यूमन राईटस् चे कार्यकर्ते रतज कलसन यांनी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत मुनमुनवर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे. इतकंच नव्हे तर जालंदरमध्ये देखील काही संघटनांनी तिच्या विरोधात प्रदर्शन करत गुन्हा दाखल केला आहे. अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळं मुनमुनच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. जर या प्रकरणी पोलिसांनी अटक केली तर तिला जामीन मिळू शकणार नाही.
मुनमुने शेअर केलेल्या व्हिडीओत तिने जातिवाचक शब्दांचा वापर करत समाजातील ठराविक समूहाचा अपमान केला होता. यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या. या व्हिडीओत ती म्हणाली, “मी लवकरच यूट्यूबर दिसणार आहे. त्यासाठी मला सुंदर दिसायचं आहे. मला ** सारखं दिसायचे नाही’. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त होऊ लागला. त्यानंतर तिनं ट्विटरद्वारे माफी देखील मागितली होती. “माझ्याकडून चूक झाली मला कोणाचाही भावना दुखवायच्या नव्हत्या. मला सर्वांनी माफ करावं” अशी विनंती तिनं केली होती तरी देखील तिच्याविरोधातील असंतोष अद्याप मावळलेला नाही.

)







