मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'सस्ता माल' कमेंटवर भडकली तापसी पन्नू; अर्वाच्य कमेंटवर सडेतोड उत्तर

'सस्ता माल' कमेंटवर भडकली तापसी पन्नू; अर्वाच्य कमेंटवर सडेतोड उत्तर

Taapasee Pannu

Taapasee Pannu

तापसीने तीव्र शब्दांत तिची नाराजी आणि संताप व्यक्त केल्यावर त्या युझरला आपलं ट्वीट डिलीट (Taapasee pannu abusive Tweet Deleted) करावं लागलं.

मुंबई, 28 एप्रिल: आजच्या युगात सोशल मीडिया हा लोकांच्या रोजच्या जगण्याचाच भाग झाला आहे. कोरोना आणि लॉकडाउन यांमुळे तर सोशल मीडियाच्या वापरात खूप मोठी वाढ झाली. तसंच, त्यातल्या अॅक्टिव्ह युझर्सची संख्या वाढली. चांगल्या, सकारात्मक कामासाठी सोशल मीडियाचा (Social Media) वापर वाढला; पण तरीही वाईट काम करणारे किंवाचांगल्या कामावर टीका करणारे किंवा त्यात खोडा घालणारे लोक जसे प्रत्यक्षसमाजात असतात,तसे व्हर्च्युअल जगात नसते तरच नवल. किंबहुना व्हर्च्युअलजगात त्यांची संख्या जास्त असल्याचा अनुभव आपण घेतो. असाच एक अनुभव नुकताच बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूला (Taapasee Pannu)आला.

तापसीपन्नूने केलेल्या रिट्विटवर अर्वाच्य भाषेतली एक कमेंट (Abusive Tweet)आली होती;मात्र तापसीने त्या युझरला सडेतोड उत्तर दिलं. नंतर त्या युझरने ती कमेंट डिलीट केली.

अभिनेता सोनू सूद (Sonu Sood)याचं कोरोनाकाळातलं काम सर्वांनाच माहिती आहे. स्वतःला कोरोनाची लागण झाली असली, तरी त्याने मदतकार्य सुरूच ठेवलं आहे. त्याच्या ट्विटर अकाउंटवरही लोक आपल्या गरजा मांडत असतात. असंच एका युझरने दिल्ली ते ग्वाल्हेर असा प्रवास करण्यासाठी ऑक्सिजनची सुविधा असलेल्या अँब्युलन्सची गरज सोनू सूदला केलेल्या Tweet मध्ये व्यक्त केली होती. 'अँब्युलन्सची गरज आहे,' असं लिहून तापसीने ते Tweet रिट्विट केलं.

तापसीच्या त्या रिट्विटवर एका युझरने तिला ट्विटरवरून मदत करण्यापेक्षा प्रत्यक्ष मदतीसाठी उतरून काहीतरी कर, असा सल्ला दिला आणि त्या ट्विटमध्ये अत्यंत वाईट भाषा वापरली. 'अपनी कार दे दे पन्नू.... सब काम ट्विटरपर ही करेगी... बकेती करवा लो इस सस्तीमाल से' असं त्याने ट्विटमध्ये लिहिलं होतं.

'यात माझी काय चूक'; संतापलेल्या डॉक्टरनं अभिनेत्रीवर ठोकला मानहानीचा दावा....

'तुम्ही कृपया तुमचं तोंड बंद ठेवाल का? या सगळ्या परिस्थितीत तुम्ही हेच सांगायचं आहे का? तर देशाचा श्वासोच्छ्वास पुन्हा पूर्वपदावर येऊ द्या आणि नंतर येऊन बोला.तोपर्यंत माझ्या टाइमलाइनवर तुमच्या नॉनसेन्सची गर्दी करू नका. मी काय करतेय ते मला करू द्या,' असं उत्तर तापसीने त्या युझरला दिलं.

त्या युझरने नंतर आपलं ट्विट डिलीट (Tweet Deleted)केलं.

तापसीच्या हातात सध्या अनेक सिनेमे आहेत. रश्मी रॉकेट ,लूप लपेटा, हसीन दिलरुबा, दोबारा या सिनेमांत ती दिसणार आहे. सध्या महिला क्रिकेटपटू मिथाली राज हिच्या जीवनावर आधारित असलेल्या शाबाश मिठू या सिनेमाच्या तयारीत ती व्यग्रआहे. प्रिया आवेन यांनी हा सिनेमा लिहिला असून,राहुल ढोलकिया तो दिग्दर्शित करत आहेत.

First published:

Tags: Taapsee Pannu, Twitter