जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'यात माझी काय चूक'; संतापलेल्या डॉक्टरनं अभिनेत्रीवर ठोकला मानहानीचा दावा

'यात माझी काय चूक'; संतापलेल्या डॉक्टरनं अभिनेत्रीवर ठोकला मानहानीचा दावा

'यात माझी काय चूक'; संतापलेल्या डॉक्टरनं अभिनेत्रीवर ठोकला मानहानीचा दावा

रायजाने काही दिवसांपूर्वी आपला एक फोटो पोस्ट केला होता. त्यामध्ये तिच्या चेहऱ्याला काहीतरी इजा (Face Allergy) झाल्याचं दिसत होतं. तिच्या एका डोळ्याला सूज आली होती. रायजाने चुकीच्या ट्रीटमेंटमुळे आपला चेहरा खराब झाल्याचं म्हटलं होतं. रायजाने त्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करत 1 कोटी रुपयांची भरपाई सुद्धा मागितली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 एप्रिल- दाक्षिणात्य अभिनेत्री (South Actress)  रायजा विल्सन(Raiza Wilson)  काही दिवसांपूर्वी खुपचं चर्चेत आली होती. रायजाने काही दिवसांपूर्वी आपला एक फोटो पोस्ट केला होता. त्यामध्ये तिच्या चेहऱ्याला काहीतरी इजा (Face Allergy) झाल्याचं दिसत होतं. तिच्या एका डोळ्याला सूज आली होती. रायजाने चुकीच्या ट्रीटमेंटमुळे आपला चेहरा खराब झाल्याचं म्हटलं होतं. रायजाने त्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करत 1 कोटी रुपयांची भरपाई सुद्धा मागितली होती.

जाहिरात

मात्र आत्ता त्याचं डॉक्टर भैरवी यांनी एका प्रेसमध्ये हे सर्व आरोप मोडीत काढले आहेत. आणि म्हटलं आहे. ही कोणतीही सर्वसामान्य ट्रीटमेंट नव्हती. चेहऱ्याची सुंदरता वाढविण्यासाठी ही ट्रीटमेंट केली जाते. रायजाने याआधी सुद्धा 2 वेळा ही ट्रीटमेंट घेतली आहे. आणि ती माझ्यावर विश्वास करत होती. या डॉक्टरने सांगितलं आहे की, तिने अभिनेत्रीच्या विरोधात ‘मद्रास हायकोर्टात’ खटला दाखल केला आहे. आणि 5 कोटी रुपयांची मानहानी देखील मागितली आहे.

या अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक लेटर पोस्ट केलं होतं. आणि त्यामध्ये डॉक्टरकडून 1 कोटी रुपयांच्या मानहानीची मागणी केली होती. त्यानंतर अनेक चाहत्यांनी तिला सपोर्ट देखील दर्शवला होता.  रायजा ‘डर्मेटोलॉजिस्ट’ भैरवी सेंथिल यांच्याकडे चेहऱ्याचं साध फेशियल करायला गेली होती. मात्र तिच्या मतानुसार डॉक्टरांच्या हेळसांड पणामुळे तिचा चेहरा खराब झाला आहे. आपण फोटो मध्ये पाहिलं आहे. रायजाच्या चेहऱ्यावर सूज आली होती आणि चेहरा काळवंडला होता. त्याचबरोबर रायजाने म्हटलं होतं. त्या डॉक्टर आत्ता माझा फोन उचलत नाहीत. आणि माझ्याशी संपर्कही करत नाहीयेत. मला भेटण्यासाठी सुद्धा त्या नकार देत आहेत. आणित्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मतानुसार त्या शहरातून भर गेल्या आहेत. (हे वाचा: मला ट्रोलर्सपासून वाचवा’; बिग बॉस फेम अभिनेत्यानं मागितली सायबर पोलिसांकडे मदत ) रायजाने 2017 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. ती पहिल्यांदा ‘VIP 2’ या चित्रपटात एका छोट्या भूमिकेत दिसून आली होती. मात्र तिला खरी ओळख ‘प्यार प्रेमा कधाल’ या चित्रपटातून मिळाली आहे. रायजाला सर्वोत्तम फिमेल डेब्यूचा पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. तसेच ती ‘बिग बॉस तमिळ’ च्या पहिल्या भागातसुद्धा सहभागी झाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात