बॉलिवूडची एक कुशल आणि गुणी अभिनेत्री तापसी पन्नूचा ‘शाब्बाश मिथू’ हा चित्रपट जुलै महिन्यात रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनाआधी तापसी सध्या तिची सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे.
या ट्रीपमध्ये चक्क साडी नेसून सुद्धा ती फिरताना दिसली. तापसीला साडी या आऊटफिटबद्दल असणारं प्रेम तर जगजाहीर आहे. ती प्रदेशात सुद्धा आपला भारतीय पोशाख मिरवताना दिसते.
तर तापसीच्या बहिणीने wine पिऊन तापसीची हालत कशी झाली हे दाखवणारा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला होता.