मुंबई 5 मार्च: देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर रोखठोक प्रतिक्रिया देणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap ) आणि अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) यांच्या घरावर आयकर विभागानं (Income Tax Department) धाड टाकली. आयकर विभागाच्या पथकांनी अनुराग आणि तापसीच्या मुंबईतील मालमत्तावर छापे टाकले. दरम्यान या कारवाईवर अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने प्रतिक्रिया देत या कलाकारांची तुलना दहशतवाद्यांशी केली. “मला पहिल्यापासूनच माहित होत ही मंडळी देशविरोधी कृत्य करत आहेत” असा टोला तिनं लगावला. काय म्हणाली कंगना? “ही मंडळी जेव्हा राष्ट्रविरोधी जाहिराती करुन मजुरांना भडकवण्याचा प्रयत्न करत होती तेव्हाच कळलं होतं काही तरी गडबड आहे. माहिती परत घेतली जाऊ शकते परंतु हे लहान मासे आहेत. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये दहशतवादी भरले आहेत. ही मंडळी आपल्या पैशांचा वापर करुन भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारनं अशा लोकांना चांगलाच धडा शिकवायला हवा.” अशा आशयाची दोन ट्विट्स करुन कंगनानं अनुराग आणि तापसीवर जोरदार टीका केली. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
Data can be retrieved, but these are small players, one can only imagine how deep rooted is terrorism in the film industry and how these bhands breaking India for money, government should set good example for everyone, they can’t sell tukde of this nation to terrorism. Jai Hind
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 5, 2021
अवश्य पाहा - अनुराग-तापसीच्या समस्यांमध्ये वाढ; इन्कम टॅक्सच्या छाप्यानंतर ED करणार चौकशी मुंबईतील तब्बल 22 ठिकाणांची झाडाझडती आयकर विभागाकडून घेतली जात आहे. यात फँटम प्रोडक्शन हाऊसशी संबंधित अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या मालमत्तावर आयकरने धाडी टाकल्या. त्यांनी कर चोरी केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं आयकर विभागानं म्हटलं आहे. या कर चोरी प्रकरणाचा तपास सुरू असल्याचंही आयकरनं म्हटलं आहे. फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती आणि त्याचं वितरण करण्याचं काम करते. अनुराग कश्यप, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणे, निर्माता मधू मंटेना आणि विकास बहल यांनी ही कंपनी 2011 मध्ये सुरू केली होती. सहसंस्थापक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर कंपनी 2018 मध्ये बंद करण्यात आली होती.