... आणि खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे डोळे आले भरून!

... आणि खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे डोळे आले भरून!

एका पत्रकार परिषदेत जनतेचे आभार मानताना अमोल कोल्हेंना अश्रू अनावर झाले.

  • Share this:

मुंबई, 15 फेब्रुवारी : झी मराठीची लोकप्रिय मालिका 'स्वराज्य रक्षक संभाजी' आता हळूहळू शेवटाकडे वळत आहे. झी टीव्हीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाउंटवर नुकताच एक प्रोमो शेअर करण्यात आला. ज्यात मुघल सैन्य आणि मुकर्रब खाननं छत्रपती संभाजी राजेंना कैद करून घेऊन जात असल्याचं दिखवण्यात आलं होतं. मागच्या आठवड्याच्या टीआरपी लिस्टमध्ये ही मालिका चौथ्या स्थानावर होती. लवकरच ही मालिका संपणार आहे. मात्र या मालिकेची जागा कोणती मालिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान शेवट गोड व्हावा म्हणुन आज स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेची संपुर्ण टिम छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान भुमी असलेल्या पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथे शुक्रवारी सायंकाळी नतमस्तक झाली. यावेळी मागील सात ते आठ वर्षापासुन या मालिकेचा संघर्ष कसा घडला हे सांगताना अभिनेता व खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे डोळे भरुन आले.

व्हॅलेंटाइन डेला मलायका अरोरानं शेअर केला VIDEO, हे खास काम करण्याचा दिला सल्ला

गेल्या दोन वर्षापासुन प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेचा शेवट जवळ आल्याचं दिसून येत असून, फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याचे डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितले. जनतेचे आभार मानत काही चुकलं,राहिलं असेल तर माफ करा असे म्हणताना अमोल कोल्हेंना यावेळी अश्रू अनावर झाले. छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान भुमी असलेल्या वढू बुद्रुक, येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ.अमोल कोल्हे बोलत होते.

जबरा फॅन! सलमानला भेटण्यासाठी त्यानं सायकलवरुन केला 600 किलोमीटरचा प्रवास

दरम्यान मालिकेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास मांडला तो तसाच पुढील ३५० पेक्षा जास्त वर्ष माणसांच्या मनावर राज्य करेल असा विश्वास अभिनेता डॉ अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

लव्ह इज इन दि एअर! Valentine's day ला अभिनेत्रीनं शेअर केला Liplock Kiss चा फोटो

First published: February 15, 2020, 8:35 AM IST

ताज्या बातम्या