जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Swara Bhasker wedding: फहादसोबत लग्न करणारी स्वरा आहे कोट्यावधींची मालकीण; 'या' वादग्रस्त वक्तव्यांमुळे आलेली चर्चेत

Swara Bhasker wedding: फहादसोबत लग्न करणारी स्वरा आहे कोट्यावधींची मालकीण; 'या' वादग्रस्त वक्तव्यांमुळे आलेली चर्चेत

स्वरा भास्कर

स्वरा भास्कर

Swara Bhasker-Fahad Ahmad Wedding: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या आपल्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने आपल्या रिलेशनशिपची कोणतीही भनक न लागू देता अचानक कोर्ट मॅरेज केल्याने सर्वांनाच सुखद धक्का बसला आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 फेब्रुवारी- बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या आपल्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने आपल्या रिलेशनशिपची कोणतीही भनक न लागू देता अचानक कोर्ट मॅरेज केल्याने सर्वांनाच सुखद धक्का बसला आहे. इंडस्ट्रीतील दमदार अभिनेत्री स्वरा भास्करने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये ‘वीरे दी वेडिंग’, ‘रांझना’, ‘प्रेम रतन धन पायो’ आणि ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ या चित्रपटांचा समावेश आहे.नुकतंच समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत लग्नबंधनात अडकलेली स्वरा कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे. इतकंच नव्हे तर आपल्या रोखठोक बोलण्याने अभिनेत्री अनेक वादविवादांत अडकलेली दिसून आली आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने गुरुवारी एका व्हिडिओद्वारे तिच्या लग्नाची अधिकृत घोषणा करत सांगितलं होतं की, तिने या नव वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 6 जानेवारीला या लग्नाची नोंदणी केली होती. आता या दोघांचं पारंपरिक पद्धतीने दिल्लीत लग्न होणार आहे. मार्चमध्ये स्वरा आणि फहाद लग्नबंधनात अडकणार आहेत. या बातमीने स्वराने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. चित्रपट विश्वातही स्वरा तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. जाणून घेऊया तिच्या काही वादग्रस्त विधानांबद्दल. (हे वाचा: Swara Bhasker-Fahad Ahmad:स्वरा भास्करने लग्नात नेसलेली साडी आणि दागिने आहेत खूपच स्पेशल; ट्विट करत सांगितली खासियत ) स्वराने साधलेला विवेक अग्निहोत्रीवर निशाणा- विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने जबरदस्त यश मिळवले होते. या चित्रपटाबद्दल स्वरा भास्करने ट्विटही केले होते. ज्यामध्ये त्यांनी विवेक अग्निहोत्रीवर निशाणा साधत म्हटलं होत, ‘जर तुम्हाला वाटत असेल की, यशासाठी तुम्ही केलेल्या मेहनतीबद्दल लोकांनी तुमचं तोंडभरुन कौतुक करावं, तर आधी गेल्या 5 वर्षांत त्यांच्या डोक्यावर बसून घाण पसरवू नका.’ अभिनेत्रीच्या या ट्विटनंतर मोठा गदारोळ झाला होता.काहींनी तिला सपोर्ट केला होता. तर काहींनी टीका केली होती. हिजाब प्रकरणावर वक्तव्य- स्वरा भास्कर हिजाबच्या वादावरही बोलली होती. यावेळी तिने द्रौपदी आणि महाभारताचा मुद्दा उपस्थित केला होता.या अभिनेत्रीने हिजाब वादाची तुलना द्वापर युगातील द्रौपदीच्या अपहरणाशी केली होती. आपल्या ट्विटमध्ये तिने लिहिलेलं, ‘महाभारतात द्रौपदीचे कपडे जबरदस्तीने उरवण्यात आले होते आणि सभेत बसलेले जबाबदार, शक्तिशाली, कायदा करणारे लोक बघतच राहिले… आज मला हेच आठवते.’ अभिनेत्रीने हे ट्विट करत पुन्हा एकदा खळबळ माजवली होती. स्वरा भास्कर पद्मावतवर केलेलं भाष्य- स्वराने ‘पद्मावत’ चित्रपटातील जौहरच्या सीनवर आक्षेप घेतला होता. अभिनेत्रीने एका पत्रात लिहिलेलं की, ‘पुरुषांची नजर फक्त महिलांच्या एका गोष्टीवर जाते का? त्यांच्यापुढे स्त्रियांचा कोणतंच आयुष्य नाही का? स्त्रीवर बलात्कार झाला तर तिला जगण्याचा अधिकार नाही का? स्त्रियांना मृत्यूशिवाय दुसरा मार्ग नाही का? अभिनेत्रीच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

स्वरा भास्करच्या संपत्तीबाबत सांगायचं झालं तर, अभिनेत्री कमाईच्या बाबतीत अनेक बड्या अभिनेत्रीनां मागे टाकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार स्वराची एकूण संपत्ती 5.4 मिलियन डॉलर्स इतकी आहे. अभिनयासोबतच स्वरा चित्रपटांच्या निर्मितीमधून कोट्यावधींची कमाई करते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात