बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री स्वरा भास्करने गुपचूप विवाह करत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे.
नुकतंच स्वरा आणि फहादने कोर्ट मॅरेज करत आपलं नातं अधिकृत केलं आहे. दरम्यान आता स्वराने फोटो शेअर करत आणखी एक महत्वाची अपडेट दिलीय.
अभिनेत्रीने कुटुंबीय आणि मित्रांच्या सहकार्याने हा सोहळा उत्तमरित्या पार पडल्याचं सांगत आभार मानले आहेत.
शिवाय आता आपण बँडबाजावाल्या लग्नाची अर्थातच पारंपरिक लग्न सोहळ्याची तयारी करत असल्याचं सांगितलं आहे.