मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Dia Mirza वर कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं निधन, शेअर केली EMOTIONAL पोस्ट

Dia Mirza वर कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं निधन, शेअर केली EMOTIONAL पोस्ट

Dia Mirza

Dia Mirza

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दियानं तिच्या खूप जवळ्याच्या व्यक्तीला गमावलं आहे.

  • Published by:  Sayali Zarad
मुंबई, 2 ऑगस्ट : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झावर (Dia Mirza) सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दियानं तिच्या खूप जवळ्याच्या व्यक्तीला गमावलं आहे. दिया मिर्झाची भाची तान्या काकडेचा मृत्यू झाला असून या बातमीनं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. दियानं सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत ही बातमी सांगतिली आहे. तिची ही पोस्ट सध्या सगळ्यांच्या भावूक करत आहे. दियानं तिच्या इन्स्टाग्रामवर तान्याचा फोटो शेअर करत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत दियानं म्हटलं की, 'माझी भाची.. माझी मुलगी.. माझी लाईफ.. आता या जगात नाही. तु कुठेही असशील, तुझ्या आत्म्याला शांती आणि प्रेम मिळो. तू नेहमी आमच्या हृदयात राहशील. ओम शांती.' दियाच्या या पोस्टवरुन तिचं आणि तिच्या भाचीचे संबंध खूप जवळचं आणि खास असल्याचं जाणवतंय.
दिया मिर्झाच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत तिचे चाहते आणि सेलिब्रिटी श्रद्धांजली वाहत आहेत. दियाच्या पोस्टवर सुनील शेट्टी, गौरव कपूर, अर्जुन रामपाल, बोमन ईराणी, ईशा गुप्ता, सिद्धांत चतुर्वेदी, रिद्धिमा कपूर साहनी आणि इतरांनी कमेंट केली. हेही वाचा -  Subodh Bhave :'लायकी नसलेल्या राजकारण्यांच्या हातात देश देऊन..'; सुबोध भावेंची खरमरीत टीका दरम्यान, सियासत दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस नेते फिरोज खान यांची सावत्र मुलगी तान्या काकडे सोमवारी सकाळी तिच्या मित्रांसह राजीव गांधी विमानतळावरून हैदराबादला जात असताना तिची कार रस्त्यावरील दुभाजकाला धडकली. या धडकेत चौघेही जखमी झाले आहेत. यात तान्याचा जागीच मृत्यू झाला.
First published:

Tags: Bollywood, Dia mirza, Emotional, Instagram post

पुढील बातम्या