मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

संकटाच्या काळात मदतीसाठी सरसावले मराठी कलाकार; स्वप्निल जोशीन गरजुंना केली मोठी मदत

संकटाच्या काळात मदतीसाठी सरसावले मराठी कलाकार; स्वप्निल जोशीन गरजुंना केली मोठी मदत

अभिनेता स्वप्निल जोशीनं (Swapnil Joshi) देखील स्वत: रस्त्यावर उतरुन बोरिवली आणि दहिसर भागांतील लोकांना मदत केली.

अभिनेता स्वप्निल जोशीनं (Swapnil Joshi) देखील स्वत: रस्त्यावर उतरुन बोरिवली आणि दहिसर भागांतील लोकांना मदत केली.

अभिनेता स्वप्निल जोशीनं (Swapnil Joshi) देखील स्वत: रस्त्यावर उतरुन बोरिवली आणि दहिसर भागांतील लोकांना मदत केली.

  • Published by:  Mandar Gurav
मुंबई 31 मे: राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. वाढत्या संक्रमणामुळं लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. (Coronavirus in Maharashtra) अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. लोकांना रुग्णालयात उपचार करण्यासाठी बेड उपलब्ध होत नाहियेत. औधषांचा तुटवडा जाणवत आहे. अशा बिकट परिस्थितीत मराठी कलाकार मोठ्या प्रमाणावर लोकांची मदत करत आहेत. अभिनेता स्वप्निल जोशीनं (Swapnil Joshi) देखील स्वत: रस्त्यावर उतरुन बोरिवली आणि दहिसर भागांतील लोकांना मदत केली. स्वप्निलनं बोरिवली आणि दहिसर भागांतील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीबांना अन्नदान केलं. शिवाय महिन्याभराचं रेशन, सिलिंडर, मास्क, सॅनिटायझर अशा वस्तू वाटल्या. काही जणांना तर त्यानं आर्थिक मदत देखील केली. यावेळी त्याच्यासोबत समाजसेवक मॉरिस नरोन्हा देखील होते. मॉरिस यांची संपूर्ण टीम कोरोना रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करत आहे. या मदत कार्यात आता स्वप्निल जोशीनं देखील मोठ्या हिरिरिनं भाग घेतला आहे. सोबतच तो कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मार्गदर्शन देखील करताना दिसत आहे. ‘वडिलांच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार’; संभावना सेठनं रुग्णालयाला पाठवली लीगल नोटीस यापूर्वी अभिनेता सिद्धार्थ जाधव देखील मोठ्या प्रमाणावर लोकांची मदत करताना दिसला. शिवाय त्यानं मराठी कलाकारांवर टीका करणाऱ्या ट्रोलर्सचा झापलं देखील होतं. “गेल्या काही दिवसांत मराठी मनोरंजसृष्टीतील अनेक तरुणांचा करोनामुळे मृत्यू झाला. सुमित्रा भावे, अभिलाषा पाटील, किशोर नांदलस्कर असे ज्येष्ठ कलाकारांना आपण करोनामुळे गमावले आहेत. हे सर्व ऐकून खूप वाईट वाटतं. मराठीसृष्टीतील अनेक कलाकार या करोनाच्या लढ्यात शक्य तेवढी मदत करत आहेत. प्रवीण तरडे, संदीप पाठक, प्रिया बेर्डे, तेजस्विनी पंडीत यांच्यासारखे अनेक कलाकार गावोगावी जाऊन लोकांना मदत करत आहेत. रक्तदानापासून अन्न धान्यापर्यंत विविध प्रकारची मदत केली जात आहे. परंतु तरी देखील लोक केवळ हिंदी कलाकारांचच अधिक कौतुक करतायेत. अर्थात आम्ही याबाबत कुठलीही जाहिरातबाजी करत नाही किंवा तक्रारही नाही. पण मराठी कलाकार काहीच करत नाहीयेत अशी कृपया तक्रार करु नका. त्यांच्या मदतीवर शंका उपस्थित करु नका.” अशी विनंती सिद्धार्थनं केली होती.
First published:

Tags: Coronavirus, Entertainment, Marathi actress, Swapnil joshi

पुढील बातम्या