मुंबई 31 मे**:** कोरोनामुळं देशभरातील हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. आतापर्यंत हजारो कुटुंब कोरोनामुळं उध्वस्त झाली आहेत. काही जण या मानसिक आघातातून सावरले परंतु काही अद्याप सावरलेले नाहीत. अभिनेत्री संभावना सेठ (Sambhavna Seth) हिनं देखील आपल्या वडिलांना गमावले. 8 मे रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे संभावनाच्या वडिलांचं दिल्लीतील रुग्णालयात निधन झालं. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते**. (coronavirus)** उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. परंतु वडिलांच्या निधनासाठी संभावनानं रुग्णालयाला जबाबदार धरलं आहे. त्यांनी योग्य प्रकारे उपचार केले नाहीत म्हणून वडिलांचं निधन झालं असा आरोप तिनं केला आहे. (Sambhavna Seth sends legal notice to hospital) शिवाय अभिनेत्रीनं रुग्णालयाला थेट कायदेशीर नोटीस देखील पाठवली आहे. लग्नामुळं काजल अग्रवालच्या करिअरला उतरती कळा; काम मिळवण्यासाठी केली मानधात कपात टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार संभावना रुग्णालयावर प्रचंड संतापली आहे. त्या रुग्णालयात रुग्णांची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही. केवळ पैसे उकळले जातात. शिवाय घरच्यांनी काहीही विचारल्यास त्यांना योग्य उत्तरं दिली जात नाहीत. त्यामुळं संभावनानं कायदेशीर रुग्णालयाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. टारझनचा प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू; Joe Lara सोबत पत्नीचाही भीषण अपघातात अंत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत संभावना म्हणाली, “कोरेना पॉझिटिव्ह आल्यानंतर 30 एप्रिल रोजी माझ्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर वैद्यकीय कर्मचार्यांनी त्यांच्या काही रक्त चाचण्या घेतल्या आणि काही दिवसातच ते बरे होतील अशी ग्वाही दिली. म्हणून आम्ही देखील शांत झालो. काही दिवसांनंतर माझा भाऊ वडिलांना भेटायला गेला, तेव्हा त्यांचे हात बांधलेले पाहून आम्हाला धक्का बसला. त्याने लगेच पप्पांचे हात उघडले आणि रुग्णालयाकडे त्याबद्दल चौकशी केली. तर, त्यांनी सलाईन काढू नये, म्हणून तसे केले आहे, असे सांगण्यात आले. या बाबत मी एक व्हिडीओ देखील तयार केला होता. परंतु रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तो व्हिडीओ हटवण्यास मला भाग पाडलं. मला असं वाटतंय की वडिलांचं निधन आधिच झालं होतं. परंतु केवळ पैसे उकळण्यासाठी त्यांनी उपचाराचं नाटक केलं.” संभावनाच्या या आरोपांवर रुग्णालयातील प्रशासनानं अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







