'दोघांच्या आयुष्यात तिसऱ्याचं आगमन...', सुव्रतनं सखीबरोबर शेअर केली आनंदाची बातमी

'दोघांच्या आयुष्यात तिसऱ्याचं आगमन...', सुव्रतनं सखीबरोबर शेअर केली आनंदाची बातमी

वायु, ध्वनी आणि जल प्रदुषण हे जणू आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटकच झाले आहेत. मात्र हे प्रदुषण कमी करण्यासाठी अभिनेता सुव्रत जोशीनं एक अनोखी शक्कल लढवली आहे. ही योजना तुम्ही देखील आमलात आणा अशी विनंती त्यानं आपल्या चाहत्यांना केली आहे.

  • Share this:

माणसानं अद्ययावत तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रचंड प्रगती केली. आज आपण घरबसल्या जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यात थेट संपर्क साधू शकतो. वेगवान वाहनांमुळं कित्येक दिवसांचा प्रवास काही तासांत करु शकतो. परंतु या वाढत्या प्रगतीमुळं पर्यावरणाचं नुकसान होत चाललं आहे. अगदी वायु, ध्वनी आणि जल प्रदुषण हे जणू आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटकच झाले आहेत. मात्र हे प्रदुषण कमी करण्यासाठी अभिनेता सुव्रत जोशीनं एक अनोखी शक्कल लढवली आहे. ही योजना तुम्ही देखील आमलात आणा अशी विनंती त्यानं आपल्या चाहत्यांना केली आहे.

सुव्रतनं एक कार खरेदी केली आहे. आता कार म्हटलं की वायु प्रदुषण तर होणारंच. परंतु हे प्रदुषण नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यानं एक अनोखी शक्कल लढवली आहे.

इलेक्ट्रिक कारमुळं कार्बन एमिशन नियंत्रणात राहीलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळं त्यानं इतर सर्वसामान्य लोकांप्रमाणेच पेट्रोलवर चालणारी कार खरेदी केली. त्यानंतर त्यानं काही पर्यावरण तज्ज्ञांशी चर्चा करुन त्याची कार किती कार्बन एमिशन सोडेल याचा अंदाज घेतला. अन् आता तो प्रत्येक सहा महिन्यात 120 झाडं लावणार आहे. व त्या झाडांची निगा राखण्यासाठी त्याला किती पैसे लागतील याचा देखील हिशोब त्यानं करुन ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर गाडीच्या एकूण किंमतीच्या पाच टक्के तो निसर्गाची हानी रोखण्यासाठी कर्च करणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Sula (@suvratjoshi)

Instagram फॉलोअर्स कमी असल्यामुळं झाली बेरोजगार; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

सुव्रतनं ही संपूर्ण माहिती एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. या पोस्टद्वारे त्यानं निसर्गाप्रती जागरुक होण्याचं आवाहन देखील केलं आहे.

Published by: Mandar Gurav
First published: February 28, 2021, 12:46 PM IST

ताज्या बातम्या