सुशांत सिंहला शेवटचा मेसेज करताना या अभिनेत्याला आला होता संशय, स्क्रिनशॉट आला समोर

सुशांत सिंहला शेवटचा मेसेज करताना या अभिनेत्याला आला होता संशय, स्क्रिनशॉट आला समोर

तुझ्यासाठी RIP नाही..या अभिनेत्याने आपल्या मित्रासाठी लिहिलेला संदेश वाचून डोळ्यात पाणी येतं.

  • Share this:

मुंबई, 15 जून : आपल्या मेहनतीच्या जोरावर कमी वयात मोठ यश संपादन करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यावर आज विलेपार्ले येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. त्याच्या वडिलांनी मनावर दगड ठेवून आपल्या मुलाचं शेवटचं दर्शन घेतलं. त्याच्या मृत्यूला 24 तास उलटून गेले आहे. त्याने घेतलेली एग्जिट मात्र चाहत्यांच्या जिव्हारी लागली आहे.

रविवारी, 14 जून रोजी त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला. टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुशांतच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. या दरम्यान सुप्रसिद्ध अभिनेता अर्जुन बिजलानी याची एक पोस्ट सध्या चर्चेत  आहे.

सुशांतला पाठविलेल्या शेवटच्या मेसेजचा स्क्रीनशॉट त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेता अर्जुन बिजलानीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसह त्याने सुशांतला पाठविलेल्या शेवटच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये अर्जुनचा पाठविलेला शेवटचा मेसेज दिसत आहे. पण सुशांतने तो मेसेज वाचला नसल्याचे दिसत नाही.

या संदेशात त्याने गणेशाचे छायाचित्र पाठवले आणि लिहिले- 'मला आशा आहे की तु ठीक आहेस'.

या स्क्रीनशॉटसह त्याने कॅप्शनमध्ये लिहिले- 'माझा शेवटचा संदेश. काहीतरी वाटलं होतं यार. बरं,तू आता वाचलं असशील. आमची बाल्कनी आठवत राहील. आता आनंदी रहा.. नेहमीच म्हणायचं की इतिहास रचेन. मला माहित आहे की आता तू जिथे आहेस तिथे आनंदात असशील. तुझ्यामुळे बरंच काही बदलेल.  चल काळजी घे. जसं मी नेहमी म्हणतो- तुझ्यासाठी RIP नाही. '

हे वाचा-'सुशांतची आत्महत्या नव्हे मर्डर', करण जोहरचं नाव घेत कंगनानंतर बबिताचाही आरोप

First published: June 15, 2020, 8:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading