मुंबई, 24 सप्टेंबर- बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थातच अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये सक्रिय झाली आहे. लग्नानंतर प्रियांका चोप्रा विदेशात स्थायिक झाली आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सिनेसृष्टीसोबतच प्रियांका सामाजिक क्षेत्रातही खूप सक्रिय आहे. प्रियांका चोप्रा शुक्रवारी युनिसेफशी संबंधित एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिच्यासोबत जगभरातील युनिसेफचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान प्रियांकाने पती निकसोबत न्यूयॉर्कमधील आपल्या सोना या रेस्टॉरंटमध्ये भोजनाचा आस्वादही घेतला आहे.
प्रियांका चोप्रा लग्नानंतर आपल्या कामामुळे विदेशात स्थायिक झाली असली, तरी तिला आपल्या देशाची प्रचंड ओढ आहे. प्रियांका सतत आपलं राष्ट्र प्रेम व्यक्त करत असते. त्याठिकाणी राहून ती प्रत्येक भारतीय सणाचा आनंद घेते. इतकंच नव्हे तर प्रियांका भारतीय भोजनाचादेखील आस्वाद घेत असते. तिने आपल्या सोना रेस्टॉरंटमध्ये अनेक भारतीय पदार्थांचा मेन्यूमध्ये समावेश केला आहे. काल कार्यक्रमानंतर प्रियंका चोप्रा पती निकसोबत आपल्या या रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी पोहोचली होती. यादरम्यान अभिनेत्रीने पाणीपुरीचा आनंद घेतला. यावेळी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रियांका फारच सुंदर दिसत होती. अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आपली एक झलक दाखवली आहे.
काही वेळेपूर्वी प्रियंका चोप्राने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर धम्माल करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये प्रियांका पती आणि मित्रांसोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. मित्रांसोबत नाईट आऊटला गेलेल्या प्रियांकाचा व्हिडिओही गुरुवारी समोर आला होता. त्यानंतर आता प्रियांकानेही रेस्टॉरंटमधील व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यावेळी प्रियांकाने नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.तसेच प्रियांकाचा पती निक जोनसने प्रियांका सोबतच्या डिनरचे फोटोही शेअर केले आहेत.
अभिनेत्री प्रियांका सध्या न्यूयॉर्कच्या दौऱ्यावर आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी न्यूयॉर्कला पोहोचलेल्या प्रियांका चोप्राने 'शाश्वत विकास लक्ष्यांबाबत' (SDG) आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत भाग घेतला होता. यानंतर प्रियांकाने काही निवडक रेस्टॉरंटमध्येही भेट दिलीय.
(हे वाचा:Bipasha basu Baby Shower: डीप नेक, स्लिट गाउन; बिपाशा बासुचं स्टायलिश डोहाळे जेवणं; फोटो आले समोर )
गुरुवारी प्रियंकाचा नाईट आऊटवर जात असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यासोबतच प्रियंका फोर्ब्सच्या फिलान्थ्रॉपी समिटमध्येही सहभागी झाली होती.त्यानंतर आता ती युनिसेफच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Hollywood, Priyanka chopra