जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sushmita Sen : 'मी ठीक आहे पण...' चाहत्यांनी चिंता व्यक्त करताच सुष्मिता सेनने दिली मोठी हेल्थ अपडेट

Sushmita Sen : 'मी ठीक आहे पण...' चाहत्यांनी चिंता व्यक्त करताच सुष्मिता सेनने दिली मोठी हेल्थ अपडेट

सुष्मिता सेन

सुष्मिता सेन

सुष्मिता सेनला या वर्षाच्या सुरुवातीलाच हार्ट अटॅक येऊन गेला. त्यानंतर काही दिवसातच सुष्मिताने परत कामाला सुरुवात केली. तेव्हापासून तिच्या चाहत्यांना तिच्या तब्येतीबद्दल काळजी आहे. आता सुष्मिताने लाईव्ह येत तिच्या तब्येतीबद्दल मोठी अपडेट दिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 जुलै : बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन नेहमीच या ना त्या कारणाने चाहत्यांचं लक्ष वेधत असते. या वर्षाच्या सुरुवातीलाच तिला हार्ट अटॅक येऊन गेला. त्यानंतर काही दिवसातच सुष्मिताने परत कामाला सुरुवात केली. तिने हार्ट अटॅक नंतर काही दिवसातच तिने रॅम्पवॉक करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. तसंच तिने शूटिंग देखील पूर्ण केली. तेव्हापासून तिच्या चाहत्यांना तिच्या तब्येतीबद्दल काळजी आहे. नुकतीच ती स्वित्झर्लंड आणि पॅरिसमध्ये व्हॅकेशन्स एन्जॉय करत होती. त्यानंतर तिच्या सोशल मीडियावर कमेंट्स करत चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती. आता सुष्मिताने लाईव्ह येत तिच्या तब्येतीबद्दल मोठी अपडेट दिली आहे. नुकतंच चाहत्यांसोबत गप्पा मारण्यासाठी सुष्मिताने इंस्टाग्रामवर एक लाईव्ह सेशन ठेवले होते. त्यात तिने चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तर दिली.  एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना तिने तिच्या तब्येतीबद्दल महत्वाची अपडेट दिली आहे. यासोबतच तिने तिच्या आगामी प्रोजेक्ट बद्दलही महत्वाची माहिती दिली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

सुष्मिता सेनने बुधवारी इंस्टाग्राम लाईव्ह सेशन केले. या लाईव्ह दरम्यान चाहत्यांनी सुष्मिताच्या तब्येतीचीही विचारपूस केली. त्यावर ती म्हणाली की, मी एकदम ठीक आहे पण मला कायम तुमची साथ असू द्या.’ तसंच,  ‘आपलं हृदय हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. आपल्या हृदयाची काळजी घ्या.’ असा सल्ला देखील तिनं चाहत्यांना दिला आहे. दिशा पेक्षाही सुंदर दिसते बहीण, ‘या’ क्षेत्रात करते काम; ऐकून तुम्हीही माराल सॅल्यूट ‘आर्या 3’च्या शूटिंगदरम्यान सेटवर अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी तंदुरुस्त झाल्यानंतर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली होती. आगामी वर्षात सुष्मिता सेनच्या आर्या या वेब सिरीजचा तिसरा सिझन देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  वेब सीरिजमध्ये भरपूर अॅक्शन पाहायला मिळणार असून सुष्मिता सेन ऍक्शन अवतारात दिसणार आहे. या वेब सीरिजच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच आता तिसऱ्या भागात सुष्मिताला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

जाहिरात

याशिवाय सुष्मिता सेनचा ‘ताली’ हा सिनेमा देखील जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनेत्रीने ट्रान्सजेंडर गौरी सावंतची भूमिका साकारली आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर सुष्मिताने दोन मुलींना दत्तक घेतले होते. त्याने 2000 मध्ये रेनेला आणि 2010 मध्ये अलिशाला दत्तक घेतले. काही दिवसांपूर्वी तिने अलिशासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये युजर्सने तिच्या कपड्यांबद्दल अश्लील कमेंट केल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात