OMG! बॉलिवूड अभिनेत्रीची मुलगी बोलते अस्खलित मराठी, VIDEO पाहून व्हाल अवाक

OMG! बॉलिवूड अभिनेत्रीची मुलगी बोलते अस्खलित मराठी, VIDEO पाहून व्हाल अवाक

सेलिब्रेटींच्या मुलं फारशी मराठी भाषा बोलताना दिसत नाही. मात्र बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी याला अपवाद ठरली आहे.

  • Share this:

मुंबई, 27 फेब्रुवारी : आज राज्यसह जगभरातही अनेक ठिकाणी कवी कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जात आहे. मग यात बॉलिवूड सेलिब्रेटी तरी मागे कसे राहतील. बॉलिवूडमध्येही असे अनेक कलाकार आहेत ज्यांना उत्तम मराठी बोलता येते. पण सेलिब्रेटींच्या मुलं फारशी मराठी भाषा बोलताना दिसत नाही. मात्र बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी याला अपवाद ठरली आहे. या अभिनेत्रीनं तिच्या मुलीची मराठी बोलतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेत्री सुष्मिता सेननं तिच्या मुलीचा मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देतानाचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात तिची लहान मुलगी अलिशा अस्खलित मराठी बोलताना दिसत आहे. 'नमस्कार, शुभ सकाळ, उपस्थित माननीय प्राचार्य, माननीय प्रार्थमिक प्रमुख, शिक्षक वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.' असं बोलताना दिसत आहे.

वासुदेव आला हो...! शंकर महादेवन यांनाही आवरला नाही Video शेअर करण्याचा मोह

सुष्मितानं आलिशाचा हा व्हिडीओ शेअर करताना लिहिल, ‘लहान मुलांच्या तोंडून कोणतीही भाषा ऐकायला गोडच वाटते.’ यासोबत सुष्मितानं आलिशाच्या मराठीच्या शिक्षका प्रितम शिखरे यांचे आभार मानले आहेत. काही दिवसांपूर्वी कंगना रणौतची बहीण रंगोलीने सुष्मिता सेनचं दोन मुली दत्तक घेतल्याबद्दल कौतुक केलं होतं. यासोबतच तिनं शिल्पा शेट्टीला मुलीच्या जन्मासाठी सरोगसीची मदत घेतल्याबद्दल टोला लगावला होता.

राणा दग्गुबातीनं 30 किलो वजन केलं कमी, आता असा दिसतो 'बाहुबली'चा भल्लालदेव

ट्विटरवर आपला मुद्दा मांडत रंगोलीने लिहिलं, 'मी सुष्मिता सेनला सलाम करते. फक्त स्वतःचे जीन आणि क्रोमोसोम टाइप आई नाही तर एक आई नेहमीच कोणत्याही मुलाची आई होऊ शकते. प्रसारमाध्यमांनी अशा लोकांचं कौतुक केलं पाहिजे जे स्वतःच्या भावनांच्या पुढे जाऊन विचार करतात आणि गरजू मुलांपर्यंत पोहचतात.'

बॉलिवूडमधील आणखी एका कपलचा काडीमोड, 10 वर्षांचा संसार मोडला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2020 04:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading