VIDEO: जोडी असावी तर अशी! भावाच्या लग्नात बॉयफ्रेंडसोबत सुश्मिता सेनचा रोमँटिक डान्स

VIDEO: जोडी असावी तर अशी! भावाच्या लग्नात बॉयफ्रेंडसोबत सुश्मिता सेनचा रोमँटिक डान्स

sushmita sen राजीव सेन आणि चारू असोपा यांचं लग्न बंगाली आणि राजस्थानी या दोन्ही पद्धतीने गोव्यात पार पडलं.

  • Share this:

गोवा, 20 जून- सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर होत आहेत. राजीवने १६ जूनला गर्लफ्रेंड चारू असोपाशी लग्न केलं. गोव्यात झालेल्या या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये जवळच्या लोकांनाच बोलावण्यात आले होते. लग्नाच्या विधींचे अनेक फोटो आणि व्हिडिओ स्वतः सुष्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. भावाच्या लग्नात सुष्मिता किती आनंदी होती हे तर तिच्या प्रत्येक पोस्टवरून स्पष्ट दिसतं.

सुष्मिताने भावाच्या संगीतमध्ये प्रियकर रोहमन शॉलसोबत खास रोमँटिक डान्स केला. या व्हिडिओमध्ये दोघांची केमिस्ट्री स्पष्ट दिसून येते. सुष्मिताने यावेळी कतरिना कैफच्या ‘बार बार देखो’ सिनेमातील ‘नचदे  ने सारे’ गाण्यावर ठेका धरला. सुष्मिता शिवाय तिच्या दोन्ही मुलींना आणि चारूच्या कुटुंबियांनी मनोसोक्त डान्स केला. राजीव आणि चारूचं लग्न बंगाली आणि राजस्थानी या दोन्ही पद्धतीने गोव्यात पार पडलं.

डान्सचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना सुष्मिताने लिहिले की, ‘संगीत आणि धमाल. फार कमी लोकांना या लग्नात बोलावल्यामुळे इथे कोणीच प्रेक्षक नव्हतं. इथे सगळ्यांनाच नाचायचं होतं.’ संगीतला नवविवाहीत जोडपं राजीव सेन आणि चारू असोपानेही कपल डान्स केला. यावेळी दोघांनी बाजीराव- मस्तानी सिनेमातील गाण्यावर ठेका धरला.

सुष्मिताच्या घरी गृहप्रवेश करतानाचा चारूचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर झाला आहे. या हॉट कपलने मुंबईत रिसेप्शन पार्टी देण्याचं ठरवलं आहे. पण ही पार्टी कधी आणि कुठे असणार याचा खुलासा अजून झालेला नाही.

VIDEO : सेटवर घुसून कलाकारांना रॉडने मारहाण, माही गिलला दुखापत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2019 11:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading