मुंबई, 3 ऑगस्ट : सुशांत सिंग राजपूत आपल्या बहिणींमध्ये सर्वात लहान होता. रक्षाबंधनाच्या सुशांतला इतक्या राख्या मिळाल्या की कदाचित दुसऱ्या कोणत्या अभिनेत्याला इतकं प्रेम मिळालं असेल. सुशांतच्या बहिणीचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. सुशांतने यापूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की त्याच्या बहिणींकडून घरात इतकं प्रेम मिळतं की बाहेर पडल्यानंतर कसं बोलायचं हे कळत नव्हतं.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुशांतची बहीण नीतू सिंह यांनी आपल्या भावासाठी एक भावूक कविता लिहिली आहे. बॉलिवूड विश्वातील बातम्या देणाऱ्या विरल भयानीने इन्स्टाग्रामवर नीतू सिंहची एक पोस्ट शेअर केली आहे.
सुशांतची बहीण नीतूने लिहिलं मन हादरवणारी नोट
आज माझा दिवस आहे
आज तुझा दिवस आहे
आज आपला दिवस आहे
आज रक्षाबंधन आहे
गेल्या 35 वर्षांपासून असं पहिल्यांदा घडत आहे की जेव्हा मी औक्षणाचं ताट सजवलं नाही...दिवा उजळवला आहे...तुझ्यासाठी टिळा आणि गोडधोड आणि राखी सजवून ठेवली आहे.
त्या हसऱ्या चेहऱ्याला शोधतेय ज्याची मी आरती करते...पण तो चेहरा नाहीये..तुझी खूप आठवण येतेय...त्या कपाळाची आठवण येतेय ज्यावर टिळा लावायची..त्या मनगटाची आठवण येतेय ज्यावर मी राखी बांधत होते..आज माझा भाऊ माझ्यासोबत नाहीये ज्याला मी प्रेमाने कडकडून मिठी मारत होते.
सुशांत सिंह आपली मोठी बहीण नीतू सिंहला राणी म्हणत होता. आणि राणी त्याला गुलशन...हे लेटर वाचून सुशांतच्या चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.