Home /News /entertainment /

ऑनलाइन रिलीज होणार सुशांतचा शेवटचा चित्रपट; चाहते म्हणाले...

ऑनलाइन रिलीज होणार सुशांतचा शेवटचा चित्रपट; चाहते म्हणाले...

सुशांत सिंह राजपूतचा दिल बेचारा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज होणार असल्याची घोषणा होताच चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्यात.

  मुंबई, 25 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (sushant sing rajput) शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' (Dil bechara) ऑनलाइन रिलीज करण्याची घोषणा करण्यात आली. 24 जुलैला डिज्नी प्लस हॉटस्टारवर (Disney+ Hotstar ) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र चाहत्यांनी सुशांतचा चित्रपट आम्हाला ऑनलाइन (online) नाही तर बिग स्क्रिनवर (big screen) पाहायचा आहे, असं म्हटलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश छाबडा यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत घोषणा केली. विशेष म्हणजे मुकेश छाबडा यांनीच कास्टिंग डायरेक्टर म्हणून सुशांतची 'काय पो छे' या चित्रपटात हिरो म्हणून संधी दिली होती, हा त्याचा पहिला चित्रपट. तर दिल बेचारा हा मुकेश छाबडा यांनी दिग्दर्शित केलेला सुशांतचा शेवटचा चित्रपट.
   
  View this post on Instagram
   

  Sushant was not just the hero of my debut film as a director but he was a dear friend who stood by me through thick and thin. We had been close right from Kai Po Che to Dil Bechara. He had promised me that he would be in my first film. So many plans were made together, so many dreams were dreamt together but never once did I ever imagine that I would be releasing this film without him. There can be no better way to celebrate him and his talent. He always showered immense love on me while I was making it and his love will guide us as we release it. And I'm glad that the Producers have made it available for everyone to watch. We are going to love and celebrate you my friend. I can visualise you with your beautiful smile blessing us from up above. Love you

  A post shared by Mukesh Chhabra CSA (@castingchhabra) on

  मुकेश छाबडा यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे, "माझ्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटाचा सुशांत फक्त हिरो नाही, तर तो माझा खूप जवळचा मित्रही होता. माझ्या सुखदु:खात त्याने मला बरीच साथ दिली. 'काय पो छे' ते 'दिल बेचारा'पर्यंत आम्ही एकमेकांच्या जवळ होतो. त्यामुळे अनेक स्वप्नं आम्ही एकत्र रंगवली, एकत्र पूर्ण केली. मात्र आता ते पाहण्यासाठी सुशांत नाही. त्याच्याशिवाय मला ही फिल्म रिलीज करावी लागेल असं मला वाटलंही नव्हतं" हे वाचा - VIDEO : 'मृत्यूची भीती वाटते', हसऱ्या चेहऱ्यानेच सुशांत सिंहने दिली होती कबुली दरम्यान मुकेश छाबडा यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्यात. ज्यामध्ये त्यांनी सुशांतचा हा चित्रपट ऑनलाइन रिलीज करू नका, तर मोठ्या पडद्यावर रिलीज करा अशी मागणी केली आहे. चाहते हा चित्रपट ऑनलाइन पाहण्यासाठी तयार नाहीत. त्यांना सुशांतला मोठ्या पडद्यावरच पाहायचं आहे. त्यामुळे सर्वांनी हा चित्रपट ऑनलाइन नव्हे तर थिएटरमध्ये रिलीज करण्याची माहणी केली आहे. आम्हाला सुशांतला मोठ्या पडद्यावर पाहायचं आहे. त्यासाठी आम्ही प्रतीक्षा करायला तयार आहोत. त्याचा हा चित्रपट ऑनलाइन रिलीज करू नका, बिग स्क्रिनवर रिलीज करा. आम्हाला त्याचा हा शेवटचा चित्रपट थिएटरमध्ये पाहायचा आहे, हीच त्याला मोठी श्रद्धांजली असेल, अशा भावना चाहत्यांनी व्यक्त केल्यात. संपादन - प्रिया लाड
  First published:

  Tags: Sushant Singh Rajpoot, Sushant Singh Rajput

  पुढील बातम्या