मुंबई,15 डिसेंबर- चीनमध्ये आतापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तेथील प्रेक्षक भारतीय चित्रपटाला भरभरून प्रेम देतात. आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटाने चीनी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं होतं. आता पुन्हा एकदा नितेश तिवारीचा 'छिछोरे' (Chhichhore) हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे.दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि श्रद्धा कपूर (Sharddha Kapoor) स्टारर चित्रपट चीनच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. पुढील वर्षी हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे.
चीनच्या १०० शहरांमध्ये होणार रिलीज-
2019 मध्ये भारतात रिलीज झाल्यानंतर 'छिछोरे' हा चित्रपट 2020 मध्ये चीनमध्ये रिलीज होणार होता. पण कोरोनाने निर्मात्यांना हा निर्णय बदलण्यास भाग पाडले. आता 67 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारा सुशांत चीनच्या प्रेक्षकांचं पसंतीस मनोरंजन करणार आहे. 7 जानेवारी 2022 रोजी सुशांत सिंह राजपूतचा छिछोरे हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे. चीनमधील 100 शहरांमध्ये सुमारे 11,000 स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
#Xclusiv... 'CHHICHHORE' TO RELEASE IN CHINA... #Chhichhore - the film that won hearts and #BO - will release in #China on 7 Jan 2022... Opens at approx 11,000 screens [100+ cities]... Stars #SushantSinghRajput and #ShraddhaKapoor. #SajidNadiadwala #NiteshTiwari #FoxStarStudios pic.twitter.com/1lqBjullu9
— taran adarsh (@taran_adarsh) December 15, 2021
छिछोरे' या चित्रपटाची कथा आयुष्यातील विजय आणि पराभव यावर आधारित आहे. विजेते आणि पराभूतांना केंद्रस्थानी ठेवून हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. सुशांत सिंगच्या 'छिछोरे' चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 153.09 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचेच नव्हे तर समीक्षकांचेही भरभरून प्रेम मिळाले आहे.
चीनमध्ये भारतीय चित्रपटांना चांगला प्रेक्षकवर्ग आहे. तिथल्या लोकांना बॉलिवूड चित्रपट खूप आवडतात. नितेश तिवारींच्या शेवटच्या रिलीज झालेल्या दंगलबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने सुमारे 1000 कोटींचा व्यवसाय करून सर्व रेकॉर्ड तोडले होते. तर भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सुमारे 350 कोटींचा टप्पा पार केला होता. अशा परिस्थितीत आता हा चित्रपट चीनच्या बॉक्स ऑफिसवरही यशाचा झेंडा फडकवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. छिछोरेकडून सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Entertainment, Sushant sing rajput