पाटणा पोलिसांची चार सदस्यीय टीम मुंबईत पोहोचली आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पाटण्यात रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयाविरोधात आयपीसीअंतर्गत 306, 341, 342, 380, 406, 420 कलमं लावली आहेत. या प्रकरणात पोलीस रियाला ट्रान्जिट रिमांडमध्ये घेऊ शकते.