सुशांतसिंह राजपूतचा फ्लॅट अद्याप रिकामाच आहे. असं सांगितलं जात आहे की, या घराच्या मालकास अजूनही नवा भाडेकरू मिळालेला नाही. या घरात कुणी राहण्यास तयार नाही.
सुशांतसिंग राजपूत 14 जून 2020 रोजी मुंबईतील बांद्र्यातल्या याच घरात मृत अवस्थेत आढळला. त्याच्या मृत्यूनंतर 6 महिन्यांपर्यंत हा फ्लॅट तपास यंत्रणेच्या ताब्यात होता.
रिअॅलिटी फर्मच्या अहवालानुसार, खरं तर या फ्लॅटचं लोकेशन एकदम प्राइम आहे. एकदम प्रशस्त, सीव्ह्यू असलेला फ्लॅट आहे.
सुशांत या घरासाठी पहिल्या वर्षी दरमहा 4 लाख 30 हजार, दुसऱ्या वर्षी 4 लाख 51 हजार, तिसऱ्या वर्षी 4 लाख 74 हजार रुपये घरभाडं देत होता.
फ्लॅट मालक आता हा फ्लॅट दरमहा 4 लाख रुपये भाड्याने देण्यास तयार आहे. पण तरीही कुणी घ्यायला तयार नाही म्हणे.