व्हिडीओ शेअर करणाऱ्या युझरने दावा केला आहे की, सुशांत या बाईकवर आपल्या डॉगीला घेऊन फिरायला जायचा. हे वाचा - SSR Death: 13 आणि 14 जूनच्या रात्री नेमकं काय झालं? त्या तिघांना घेऊन CBI पुन्हा सुशांतच्या घरी काही दिवसांपूर्वी सुशांतची भाजी मल्लिका सिंहने फजचा एक व्हिडीओ शेअर केला होता. जो इन्स्टाग्रामवर व्हारल होत होता. फज आजही सुशांतची करतो आहे. दरवाज्यावर आवाज येताच त्याचं लक्ष तिकडे जातं, मोठ्या आशेने तो दरवाजाकडे पाहतो, असं या पोस्टमध्ये म्हटलं होतं.#Fudge looking for @itsSSR near his bike. The two used to share a ride quite often. #unitedforjustice pic.twitter.com/jMn2VEwsEt
— United For Justice (@sushantf3) August 22, 2020
या व्हिडीओसह सुशांतने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. ज्यामध्ये सुशांत फजसह खेळताना दिसतो आहे. सुशांतने हा व्हिडीओ 2018 साली आपल्या सोशल मीडियावर शेअर केला होता.
"जर मी तुझ्या कायम स्मरणात असेल तर मला इतर कुणी विसरलं तरी मला त्याची चिंता नाही", अशी पोस्ट त्याने या व्हिडीओसह केली होती. हे वाचा - सुशांतच्या नव्या पोस्टमार्टम रिपोर्टने खळबळ, मानेवर होती 33 सेमी लांब खूण मुंबईतील वांद्र्यात राहत्या घरात 14 जूनला सुशांतचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या झाल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. सुशांतच्या कुटुंबाने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर अनेक आरोप केले आहेत. दरम्यान आता सुशांतच्या मृत्यूप्रकरणी आता सीबीआय तपास सुरू आहे.“If you remember me, then I don't care if everyone else forgets.”#mylove #Fudge 💫❤️ ~ Kafka on the Shore#murakami pic.twitter.com/LZAURReLg7
— Sushant Singh Rajput (@itsSSR) December 14, 2018
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sushant Singh Rajput