दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा पहिला स्मृतिदिन 14 जून 2020 ला झाला. अभिनेत्याच्या निधनानंतर तो नैराश्याने ग्रस्त असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अजूनही त्याच्या मृत्यूचे गूढ सुटलेले नाही. तरुण वयातच त्याने बरंच काही साध्य केलं होतं. तो हुशार विद्यार्थी होता.
बिहारमधील पटणा येथे वाढलेल्या सुशांतने शहरातील सेंट कॅरन हायस्कूल आणि त्यानंतर नवी दिल्लीतील हंसराज मॉडेल स्कूलमधून बारावी पर्यंत शिक्षण घेतले.
सुशांतने 2003 साली दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या प्रवेश परीक्षेत ऑल इंडिया सातवा रँक (All India Rank 7th) मिळविला.
यानंतर त्यानी दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (आता दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटी) मधून मेकॅनिकल इंजिनियरिंगचा अभ्यास सुरू केला
सुशांतसिंग राजपूत यानी एका टीव्ही कार्यक्रमात आपल्या जीवनाबद्दल बोलताना सांगितले की, त्यांची गणना DCEच्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांमध्ये केली जाते, परंतु जेव्हा तो पहिल्या सेमिस्टरमध्ये होता तेव्हा त्याला हॉस्टेलमधून बाहेर काढण्यात आले होते.
तो फिज़िक्स मध्ये राष्ट्रीय ऑलिम्पियाड विजेता देखील होता. तो आयएसएम धनबादसह 11 इंजिनियरिंग परीक्षेत पास झाला होता.
थिएटर आणि डान्स क्लासमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सुशांतला अभ्यासासाठी कदाचित वेळच मिळाला नाही, म्हणूनच त्याने DTU सोडलं.