Home /News /entertainment /

अब मरने से काए डर! 8 महिन्यांपासून होती सुशांतच्या मनात खदखद, 'या' पोस्टमधून समोर आलं डिप्रेशन

अब मरने से काए डर! 8 महिन्यांपासून होती सुशांतच्या मनात खदखद, 'या' पोस्टमधून समोर आलं डिप्रेशन

पुढे वाचा-फक्त सुशांतच नाही ‘या’ बॉलिवूड कलाकारांनीही डिप्रेशनमधून उचललं आत्महत्येचं पाऊल

पुढे वाचा-फक्त सुशांतच नाही ‘या’ बॉलिवूड कलाकारांनीही डिप्रेशनमधून उचललं आत्महत्येचं पाऊल

सुशांत आपल्या इन्स्टापोस्टमधून कायम आपली खदखद बोलून दाखवत होता. मात्र तो असं काही करेल, असं कधीच कोणाला वाटलं नाही.

    मुंबई, 14 जून : सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनानं बॉलिवूडमध्ये कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. स्वत:च्या हिमतीच्या जोरावर सुशांतनं बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं, मात्र आता पुन्हा एकदा बॉलिवूड आणि नैराश्य या विषयावर बोललं जात आहे. छोट्या शहरातून इंजिनिअरींग करून मग डान्स शो, टीव्ही सिरिअल आणि बॉलिवूड असा सुशांतचा प्रवास होता. तो एक प्रतिभावंत कलाकार होता, त्यामुळं त्याच्यावर टीका कमी आणि त्याचं कौतुक जास्त व्हायचं. मात्र तरी काही गोष्टी त्याच्या नैराश्याचं कारण ठरली. सुशांत आपल्या इन्स्टापोस्टमधून कायम आपली खदखद बोलून दाखवत होता. मात्र तो असं काही करेल, असं कधीच कोणाला वाटलं नाही. वाचा-सुशांत सिंह आणि दिशाची एका पाठोपाठ आत्महत्या, धक्कादायक माहिती आली समोर! एकदा एका मुलाखतीत सुशांत म्हणाला होती की, मी रोज विचित्र पद्धतीनं स्वत:ला हिमत देत असतो. कधी कधी स्वत:च कानाखाली मारतो. सुशांत इतर बॉलिवूड अभिनेत्यांप्रमाणे नव्हता. तो अलिप्त होता, एकाकी होता. हे त्याच्या पोस्टमधून कळून यायचं. वाचा-आत्महत्या नाही तर खून! सुशांत सिंह राजपूतच्या मामाचा आरोप, CBI चौकशीची मागणी प्रेमानंही त्याला दगा दिला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो खूश होतं. पण सुशांतचं नैराश्य काही थांबलं नाही. मानसोपचार सुरू होते, पण तो गोळ्या घेत नव्हता, मेडिटेशन करत नव्हता. मात्र त्यानं आजपासून आठ महिन्यांपूर्वी केललं ट्विट वाचून, सुशांत टोकाचं पाऊल उचलण्याचे संकेत तर देत नव्हता? असा विचार येतो. असेच ट्विट केले. वाचा-सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, सुसाइडआधी केला होता मित्राला कॉल पण... ऑक्टोबरमध्ये 2019मध्ये सुशांतनं, “एहसान तेरा होगा मुझ पर, दिल चाहता है वो कहने दो ...”, या ओळी ट्वीट केल्या होत्या. यानंतर सतत सुशांत काही ना काही इन्स्टाग्राम आणि ट्वीट पोस्ट करत राहिला. सुशांतनं शेवटची पोस्ट ही आपल्या आईबाबत केली होती. सुशांतनं इनस्टाग्रामवर आईसाठी एक भावनिक कविता लिहिली होती. आईबाबत अखेरची भावनिक पोस्ट सुशांत अनेकदा आपल्या सोशल मीडियावर कविता शेअर करत असायचा, मात्र त्याची अखेरची पोस्ट ही खास होती. त्यानं आपल्या आईच्या आठवणीत लिहिलेली एक कविता शेअर केली होती. सुशांतनं यात त्याच्या आईसोबतचा फोटो कोलाज करून, "अश्रूंनी अंधुक झालेला भूतकाळ आणि हसतमुख क्षणभंगुर आयुष्य. या दोघांमधील संभाषण म्हणजे #आई", अशी भावनिक कविता शेअर केली होती. वाचा-sushant singh death: या कारणांमुळे होता सुशांत सिंह राजपूत होता डिप्रेशनमध्ये? संपादन-प्रियांका गावडे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या