जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सुशांतला नव्हती आर्थिक अडचण, एका सिनेमासाठी घ्यायचा एवढं मानधन

सुशांतला नव्हती आर्थिक अडचण, एका सिनेमासाठी घ्यायचा एवढं मानधन

सुशांतला नव्हती आर्थिक अडचण, एका सिनेमासाठी घ्यायचा एवढं मानधन

काहींनी आर्थिक अडचणीमुळे सुशांतनं आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. पण त्याच्या एका जवळच्या मित्रानं त्याला कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या नव्हती असं सांगितलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 जून : सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput )निधनानं सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच्या निधनानंतर मुंबई पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. पोलिसांनी सुशांतच्या जवळच्या सर्व व्यक्तीची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले आहेत. पण त्याच्या आत्महत्येमागे वेगवेगळी कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. काहींनी त्याच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरलं आहे तर काहींनी आर्थिक अडचणीमुळे सुशांतनं आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. पण त्याच्या एका जवळच्या मित्रानं त्याला कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या नव्हती असं सांगितलं आहे. पिंकव्हिलानं दिलेल्या वृत्तानुसार सुशांत सिंह राजपूतच्या मित्रानं सागितलं, सुशांतला कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या नव्हती. त्याच्याकडे बरेच सिनेमा होते आणि काही सिनेमांच्या प्रोजेक्टवर काम सुरू होतं. पुढच्या वर्षाच्या मध्यापर्यंत त्याचं शेड्युल बिझी होतं. 2022 पर्यंत त्यानं आणखी दोन सिनेमा साइन केले असते तर त्याच्याकडे एकूण 5 सिनेमे असणार होते. सुशांत एका सिनेमासाठी 8 कोटी रुपये एवढं मानधन घेत होता. ‘या लोकांमुळे त्यानं अंकिताशी ब्रेकअप केलं’ रंगोलीचा सुशांतच्या PR टीमवर निशाणा

जाहिरात

सुशांतचा मित्र पुढे म्हणाला, दोन प्रोड्युसर त्यांचे सिनेमा साइन करण्यासाठी सुशांतला भेटणार होते. ते सुशांतच्या टचमध्ये नव्हते मात्र त्यांनी त्याच्या कॉमन फ्रेंडच्या माध्यामातून सुशांतशी बोलणी केली होती. याशिवाय ते आपल्या सिनेमात काम करण्यासाठी सुशांतला 11 कोटी रुपये एवढं मानधन द्यायला तयार झाले होते. सुशांच सिंह राजपूतनं 14 जून रविवारी वांद्रेमधील त्याच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. सुशांतनं त्याच्या करिअरची सुरुवात 2009 मध्ये पवित्र रिश्ता या मालिकेतून केली होती. त्यानंतर 2013 मध्ये ‘काय पो छे’ या सिनेमातून त्यानं बॉलिवूड पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं ‘शुद्ध देसी रोमांस’, ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘राबता’, ‘केदारनाथ’ और ‘सोनचिड़िया’ या सारख्या सिनेमात काम केलं. सुशांतच्या आत्महत्येबाबत होणाऱ्या आरोपानंतर सलमानने सोडलं मौन, म्हणाला… सुशांतच्या आत्महत्येनंतर ट्रोल; या 3 सेलेब्रिटींनी ट्विटरवरून काढला पळ

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात