रिया चक्रवर्ती, श्रुती मोदीचं खरं नातं आलं समोर; जबरदस्ती बनवलं होतं सुशांतची मॅनेजर

रिया चक्रवर्ती, श्रुती मोदीचं खरं नातं आलं समोर; जबरदस्ती बनवलं होतं सुशांतची मॅनेजर

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (sushant singh rajput) एक्स मॅनेजर श्रुती मोदी (shruti modi) आणि त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (rhea chakraborty) एकमेकींना आधीपासूनच ओळखायच्या.

  • Share this:

दिवाकर सिंह/मुंबई, 16 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात  (Sushant Singh Rajput Death Case) सुशांतच्या कुटुंबाने अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह (Rhea Chakraborty) सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदीवरदेखील (shruti modi) आरोप केला होता. आता या प्रकरणाच्या ड्रग्ज अँगलच्या तपासात श्रुती मोदीचीही चौकशी होते आहे. श्रुती मोदी ही रिया चक्रवर्तीची लहानपणीची मैत्रीण असल्याचं समोर आलं आहे आणि सुशांतवर दबाव टाकून रियाने तिला सुशांतची मॅनेजर बनवलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

श्रुती मोदीला आज एनसीबीने चौकशीसाठी बोलावलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण रियाला आधीपासून ओळखत असल्याचं श्रुतीने एनसीबीला सांगितलं आहे. रिया आणि श्रुती लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहेत. रियानेच श्रुती आणि सुशांतची भेट घडवून दिली आणि तिला मॅनेजर बनवलं. सुशांत श्रुतीला आपला मॅनेजर बनवण्यासाठी तयार नव्हता. मात्र रियाने त्याच्यावर दबाव टाकला आणि श्रुतीला त्याचा मॅनेजर बनवलं.

हे वाचा - सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीवर मोठा आरोप; NCB कडून तपास

श्रुतीला रिया आणि शोविकच्या ड्रग्ज व्यवहाराबाबत पूर्णपणे माहिती होती. ती या प्रकरणात पूर्णपणे सहभागी होती. सुशांतच्या इथं नोकरी सोडल्यानंतरदेखील श्रुती रिया आणि ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होती. सीबीआयने श्रुतीचा फोन जप्त केला आहे, त्यामध्येदेखील ड्रग्ज पेडलरसह तिचे चॅट्स सापडले आहेत.

हे वाचा - NCB ने विचारलेले हे 55 प्रश्न; ज्यांची उत्तरं देताना रिया चक्रवर्तीला फुटला घाम

श्रुती मोदीचे वकील अशोक सरावगी यांनी सांगितलं, "रिया आणि श्रुती दोघांची ओळख कोलकात्यात झाली. पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर श्रुतीने सुशांतच्या इथली मॅनेजरची नोकरी सोडली. ड्रग्ज कनेक्शनबाबत मला काही माहिती नाही. याबाबत एनसीबी तपास सुरू आहे. हे प्रकरण कोर्टात येत नाही, तोपर्यंत मी काही बोलणार नाही. न्यायालयात प्रकरण आल्यानंतर आम्ही सर्व पुरावे कोर्टासमोर ठेवू"

Published by: Priya Lad
First published: September 16, 2020, 4:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading