अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला तीन महिने पूर्ण झाले आहेत. सुशांतची हत्या झाली की आत्महत्या हे अद्याप समजेलंल नाही. मात्र या प्रकरणातील ड्रग्ज अँग समोर आला आणि सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आलेली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआय या प्रकरणाचा अंतिम अहवाल काही दिवसांतच जारी करणार आहे. दरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) रियाला विचारलेल्या प्रश्नांची यादी न्यूज 18 च्या हाती लागली आहे.