मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ड्रग्जप्रकरणी 6 महिन्यांतच दाखल होणार चार्जशीट; बडे सेलिब्रिटी NCB च्या रडारवर

ड्रग्जप्रकरणी 6 महिन्यांतच दाखल होणार चार्जशीट; बडे सेलिब्रिटी NCB च्या रडारवर

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात ड्रग्ज (drugs) अँगलचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) आता महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात ड्रग्ज (drugs) अँगलचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) आता महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात ड्रग्ज (drugs) अँगलचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) आता महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले आहेत.

  मुंबई, 28 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलच्या तपासात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) करत असलेल्या तपासाला आता अधिक वेग आला आहे. एनसीबी लवकरच चार्जशीट दाखल करणार आहे. मोठमोठे बॉलिवूड सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवर आहेत. त्यापैकी काही जणांची आता चौकशी सुरू आहे. शिवाय आणखी अधिक खुलासे होण्याची शक्यता आहे. एनसीबीचे प्रमुख राकेश अस्थाना यांची एनसीबीच्या अधिकाऱ्यांसह बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीमला या प्रकरणात कारवाई पुढे नेण्यास सांगितली आहे. जवळपास पाच तास ही बैठक झाली. यानंतर राकेश अस्थाना यांंनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या टीमला सहा महिन्यांत चार्जशीट दाखल करण्यास सांगितलं आहे. या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला आधीच अटक झाली आहे. आता दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांची चौकशी सुरू आहे. तसंच 48 तासांत आणखी काही बड्या स्टार्सनादेखील एनसीबीची चौकशीसाठी समन्स बजावणार असल्याची माहिती मिळते आहे.  आतापर्यंत कमीत कमी 18 जणांना अटक करण्यात आली आहे. शिवाय अजूनही  20 पेक्षा अधिक ड्रग्ज पेडलर्सवर एनसीबीची नजर आहे. ते ड्रग्ज चॅट माझेच - दीपिका पादुकोण सूत्रांच्या माहितीनुसार शनिवारी चौकशी दरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोणला एनसीबीकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांमुळे रडू कोसळलं. 5 तासांच्या चौकशीत दीपिका तब्बल 3 वेळा रडली असल्याची सूत्रांची माहिती आहे. सूत्रांची अशी माहिती मिळाली आहे की, या चौकशीवेळी तिची  मॅनेजर करिश्मा प्रकाश हिला देखील दीपिकासमोर आणण्यात आलं आणि दोघींना काही सवाल करण्यात आले. हे वाचा - "अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...", पायल घोषणने दिला इशारा या चौकशीत अभिनेत्री दीपिका पादुकोणने ड्रग चॅटची कबुली दिली आहे. त्याचप्रमाणे तिने Coco क्लबसंदर्भातील बाब देखील मान्य केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. 2017 चे हे चॅट होते, ज्यामध्ये कोको क्लबमध्ये भेटण्याबाबत भाष्य करण्यात आले होते. दीपिकाने या गोष्टी मान्य केल्या असल्या तरी ड्रग्जबाबत तिने अजून कोणतं स्टेटमेंट दिलेलं नाही. आम्ही एखादी सिगरेट पितो पण ते खूप कॉमन आहे, असं तिनं सांगितलं. फार्म हाऊसवर ड्रग्ज आणि दारुची पार्टी झाली - श्रद्धा कपूर

  एनसीबीच्या सूत्रांकडून माहिती मिळते आहे की या चौकशी दरम्यान अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने छिछोरे (Chhichhore ) सिनेमावेळी केलेल्या पार्टीबाबत माहिती दिली. एनसीबीच्या चौकशीमध्ये श्रद्धा कपूरने अशी माहिती दिली आहे की छिछोरेच्या पार्टीमध्ये ती पवना फार्म हाऊसवर गेली होती तेव्हा त्या पार्टीमध्ये तिने केवळ डान्स केला होता. तिने अशी माहिती दिली की तिने यावेळी ड्रग्ज घेतले नव्हते. हे वाचा - Drug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव एनसीबीच्या प्रश्नांना उत्तरं देताना श्रद्धा कपूरनं सांगितलं, ती छिछोरेच्या पार्टीमध्ये गेली होती. दुपारी 3 वाजताच्या सुमारास ते पवना फार्म हाऊसवर पोहोचले होते. दुपारी जेवल्यानंतर ते आयलँडला पोहोचले होते. तिथे ड्रग्ज आणि दारुची पार्टी झाली. रात्री उशिरापर्यंत म्युझिक लावून त्या ठिकाणी पार्टी करण्यात आली होती. त्यावेळी अनेकांनी ड्रग्ज घेतले पण तिने ड्रग्ज घेतले नाहीत, असं ती म्हणाली. सारा अली खानचा सुशांतबरोबरच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा सारा अली खानने NCB च्या चौकशीत 2018 मध्ये केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आपण सुशांतबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं कबूल केलं आहे. एवढंच नाही तर या चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर सुशांतच्या केप्री हाऊस इथल्या घरात त्याच्याबरोबर राहायलाही सारा गेली होती. हे वाचा - Ranbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ सारा आणि सुशांत थायलंडला ट्रिपसाठी गेले होते. तिथे कोह आयलंडवर एका पार्टीत ते सहभागी झाले होते. या पार्टीतला एक video तपासादरम्यान पुढे आला आहे. या पार्टीत ड्रग्ज घेतले गेल्याचा आरोप आहे. शूटिंग दरम्यान सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज घ्यायचा, असंही साराने NCB ला सांगितलं आहे. NCB ने केलेल्या चौकशीत साराने आपण स्वतः ड्रग्ज घेत नाही, असं स्पष्ट केलं.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या