Home /News /entertainment /

"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...", लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या पायल घोषणने दिला इशारा

"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...", लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या पायल घोषणने दिला इशारा

दोन दिवसांपूर्वीच पायल घोषने (payal ghosh) अनुराग कश्यपवर (anurag kashyap) आरोप करून आपल्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित करत सोशल मीडियावर एक पोस्ट करून खळबळ उडवून दिली होती.

    मुंबई, 27 सप्टेंबर : दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) लैंगिक छळाचा आरोप करणारी अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) आता अधिक आक्रमक झाली आहे. वर्सोवा पोलीस ठाण्यात पायलने अनुराग कश्यपविरोधात तक्रार दाखल केली आहे. रविवारी ती पोलीस स्टेशनमध्ये गेली.जर अनुरागविरोधात कारवाई केली नाही तर उपोषण करेन, असा इशारा तिने दिला आहे. 19 सप्टेंबरला पायलने ट्वीट करून अनुरागवर आरोप केले होते. 22 सप्टेंबरला तिनं वर्सोवा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. पायल आणि तिचे वकील नितीन सतपुते रविवारी पोलीस ठाण्यात गेले. तपासात वेग आणावा अशी मागणी त्यांनी केली. त्यानं पोलीस स्टेशनबाहेर तिनं प्रसारमाध्यामांशी संवाद साधला. पायल म्हणाली, "अनुराग कश्यप प्रभावशाली व्यक्ती आहेत. त्यामुळे पोलिसांनी प्राथमिक तक्रार दाखल केल्यानंतरही त्याला अजून अटक केली नाही. जर मला लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर मी उपोषण करणार" पोलीस ठाण्यात आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. तपास अधिकारी पोलीस ठाण्यात नव्हते त्यामुळे सोमवारी पुन्हा बोलवलं असल्याचंही तिनं सांगितलं. हे वाचा - Drug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव दोन दिवसांपूर्वीच पायलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या सुरक्षेबाबत देखील शंका उपस्थित केली आहे. इन्स्टाग्रामवर पायलने शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, 'मिस्टर अनुराग कश्यप यांच्या विरोधात मी एका प्रसिद्ध पोर्टलला या घटनेसंदर्भात मुलाखत दिली होती आणि मला असे माहित झाले की यासाठी स्वत: अनुराग कश्यपची मला परवानगी घ्यायला हवी होती. इंडिया, मी जर छताला लटकलेली सापडले तर लक्षात ठेवा. मी आत्महत्या केली नसेन. त्यांच्याकडे नैराश्य आणि मेडिकेशनची कहाणी तयार आहे.' अशी पोस्ट करताना तिने #NotGoingDown #MeToo हे दोन हॅशटॅग देखील वापरले आहेत. हे वाचा - अख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ पायलने लैंगिक छळाचा आरोप करताच अनुरागने 20 सप्टेंबरला ट्वीट करून आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. दरम्यान कंगना रणौत सोडता अनेक अभिनेत्रींनी अनुरागचं समर्थन केलं आहे. अनुरागच्या एक्स पत्नींनीदेखील त्याला पाठिंबा दिला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या