मुंबई, 22 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर दररोज बॉलिवूडमधील नवनव्या कलाकारांची नावं समोर येत आहेत. रिया चक्रवर्ती सध्या तुरुंगात असून NCB च्या चौकशीतून अनेक गोष्टी समोर येत आहे. आतापर्यंत प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पादुकोन यांसारख्या बड्या अभिनेत्रींची नावं ड्रग्ज प्रकरणात समोर आली आहेत. त्यानंतर दीपिका पादुकोनचा एक व्हॉट्सअॅप चॅट समोर आल्यानंतर अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. दरम्यान एका मराठी अभिनेत्रीचं नाव ड्रग्ज प्रकरणात समोर आलं आहे. अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिचं नाव या प्रकरणात समोर आलं आहे. त्यामुळे चौकशीसाठी नम्रता शिरोडकरला बोलावण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नम्रताने दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबू याच्यासोबत विवाह केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती चित्रपटसृष्टीत फार सक्रिया नाही. सध्या बॉलिवूडची स्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण हीचं नाव देखील या तपासात समोर आलं आहे. सगळ्यात आधी करिश्माची चौकशी करण्यात येईल त्यानंतर गरज पडल्यास दीपिकाला समन्स बजावण्यात येईल असं NCB नं म्हटलं आहे. हे ही वाचा- Drug Case: आज किंवा उद्या होणार श्रद्धा कपूर आणि सारा अली खानची चौकशी- सूत्र दीपिका ही सध्या गोव्यामध्ये तिच्या सिनेमाचं शूट करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे NCB सगळ्यात आधी करिश्माची चौकशी करणार आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) केलेल्या ड्रग्स प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पादुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) अशी नावं समोर आली आहेत. त्यापैकी सर्वात धक्कादायक आणि सर्वात मोठे नाव म्हणजे दीपिका पादुकोण. यावेळी दीपिकाचे ड्रग्ज चॅटही समोर आले आहेत. या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये दीपिका करिष्माला माल आहे का विचारत आहे. त्यावर करिष्माने घरी असल्याचे उत्तर दिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.