Home /News /entertainment /

सुशांत सिंह राजपूतचे 'ते' 15 कोटी रुपये नेमके कुठे? CBI ला सापडला धागादोरा

सुशांत सिंह राजपूतचे 'ते' 15 कोटी रुपये नेमके कुठे? CBI ला सापडला धागादोरा

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने (rhea chakraborty) अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे (sushant singh rajput) 15 कोटी रुपये लुटल्याचा आरोप त्याच्या कुटुंबाने केला होता. मात्र याबाबत रियाच्या बँक खात्यात काही व्यवहार दिसून आला नव्हता.

    मुंबई, 16 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) कुटुंबाने त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने (rhea chakraborty) सुशांतचे 15 कोटी रुपये लुटल्याचा आरोप केला होता. मात्र रियाच्या बँक खात्यात असा कोणताही व्यवहार सापडला नाही. मग सुशांतच्या वडिलांनी 15 कोटींचा हा आरोप केला होता, इतकी मोठी रक्कम मग नेमकी गेली कुठे असा प्रश्न उपस्थित होतो आहे. दरम्यान याबाबत आता सीबीआयला धागादोरा सापडला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सुशांतच्या कुटुंबाने सुशांतच्या ज्या 15 कोटी रुपयांबाबत तक्रार केली, ते पैसे सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदीच्या वडिलांच्या कंपनीत गुंतवले असल्याची माहिती सीबीआयला मिळाली आहे. श्रुतीच्या वडीलांची गार्मेंटची मोठी कंपनी आहे. याप्रकरणी आता लवकरच तपास होणार आहे. दरम्यान रिया चक्रवर्ती आणि श्रुती मोदी एकमेकींना आधीपासूनच ओळखत होत्या, अशी माहितीदेखील समोर येत आहे. श्रुती ही रियाची लहानपणीची मैत्रीण आहे आणि सुशांतवर दबाव टाकून रियाने तिला सुशांतची मॅनेजर बनवलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हे वाचा - रिया चक्रवर्ती, श्रुती मोदीचं खरं नातं उघड; जबरदस्ती बनवलं होतं सुशांतची मॅनेजर श्रुती मोदीला आज एनसीबीने चौकशीसाठी बोलावलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण रियाला आधीपासून ओळखत असल्याचं श्रुतीने एनसीबीला सांगितलं आहे. रिया आणि श्रुती लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहेत. रियानेच श्रुती आणि सुशांतची भेट घडवून दिली आणि तिला मॅनेजर बनवलं. सुशांत श्रुतीला आपला मॅनेजर बनवण्यासाठी तयार नव्हता. मात्र रियाने त्याच्यावर दबाव टाकला आणि श्रुतीला त्याचा मॅनेजर बनवलं. श्रुतीला रिया आणि शोविकच्या ड्रग्ज व्यवहाराबाबत पूर्णपणे माहिती होती. ती या प्रकरणात पूर्णपणे सहभागी होती. सुशांतच्या इथं नोकरी सोडल्यानंतरदेखील श्रुती रिया आणि ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होती. सीबीआयने श्रुतीचा फोन जप्त केला आहे, त्यामध्येदेखील ड्रग्ज पेडलरसह तिचे चॅट्स सापडले आहेत. हे वाचा - सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीवर मोठा आरोप; NCB कडून तपास श्रुती मोदीचे वकील अशोक सरावगी यांनी सांगितलं, "रिया आणि श्रुती दोघांची ओळख कोलकात्यात झाली. पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर श्रुतीने सुशांतच्या इथली मॅनेजरची नोकरी सोडली. ड्रग्ज कनेक्शनबाबत मला काही माहिती नाही. याबाबत एनसीबी तपास सुरू आहे. हे प्रकरण कोर्टात येत नाही, तोपर्यंत मी काही बोलणार नाही. न्यायालयात प्रकरण आल्यानंतर आम्ही सर्व पुरावे कोर्टासमोर ठेवू"
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या