सुरवीनला मुंबईत तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तिला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत तिनं या लाजिरवाण्या घटनेचा खुलासा केला आहे. अभिनेत्री साऊथ सिनेसृष्टीत कास्टिंग काउचची शिकार झाली होती.
सुरवीन म्हणते की तिला तिच्या लठ्ठपणामुळे किंवा वाढलेल्या वजनामुळे बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. तिनं सांगितलं की डेब्यू चित्रपटाच्या पहिल्या भेटीत तिला तिचं वजन, कंबर आणि छातीचं माप विचारण्यात आलं होतं.
सुरवीनाने सांगितलं की, जेव्हा ती छोट्या पडद्यावरून चित्रपटात येण्याचा विचार करत होती, तेव्हा मुंबईत अशाच एका मीटिंगमध्ये कोणीतरी सांगितले होते की, ५६ किलो वजन असलेल्या चित्रपटात काम कसे करता येईल.
सुरवीनाने सांगितलं की जेव्हा ती छोट्या पडद्यावरून चित्रपटात येण्याचा विचार करत होती तेव्हा मुंबईत अशाच एका मीटिंगमध्ये सांगण्यात आलं होतं की तुझ्या 56 किलो वजनामुळं तुला चित्रपटात काम करता येणार नाही.
सुरवीन सांगते की इंडस्ट्रीतील बहुतांश महिलांच्या शारीरिक स्वरूपाबाबत, चेहऱ्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. अशा वेळी त्यांना अत्यंत अश्लील प्रश्नही विचारण्यात येतात. सुरवीना चावला बॉलिवूडमध्ये तिच्या बोल्डनेससाठीही ओळखली जाते. तिने एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिनं 'हेट स्टोरी 2', 'पार्च्ड', 'क्रिएटर 3D' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. सुरवीनने 'सेक्रेड गेम्स' मध्येही महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.